शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

बारावीचा निकाल ८९ टक्के, शहरात यंदाही मुलींचीच बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 23:54 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला आहे.

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला आहे. या निकालामध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. शहरात बारावीचा ८९.१३ टक्के निकाल लागला आहे. तर सुमारे ३ महाविद्यालयांच्या सर्वच शाखांचा निकाल १00 टक्के लागला आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जल्लोष साजरा केला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र प्रात्यक्षिक परीक्षा १ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २0१९ व २१ फेब्रुवारी ते २0 मार्च या कालावधीमध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली होती.परीक्षेसाठी नवी मुंबई शहरातील तिन्ही शाखेच्या ६0 हून अधिक महाविद्यालयांमधून १४,८७९ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामधून १४,८७३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ६९४ पुनर्परीक्षार्थी या परीक्षेला बसले होते. यामधून १२,८६२ नियमित परीक्षार्थी पास झाले असून १८८ पुनर्परीक्षार्थी पास झाले आहेत.नवी मुंबई शहरातील फादर अँगल महाविद्यालय वाशी, नेरु ळमधील सेंट झेवियर्स हायस्कूल आणि महाविद्यालय, सीवूडमधील सिक्रेट हार्ट स्कूल आणि महाविद्यालय या महाविद्यालयांमधील सर्वच शाखांचा निकाल १00 टक्के लागला आहे. कोपरखैरणेमधील रा.फ. महाविद्यालयाच्या सायन्स शाखेचा, कोपरखैरणे येथील ख्रिस्ट अ‍ॅकॅडमी, सेंट मेरी महाविद्यालय, सीबीडी येथील भारती विद्यापीठ महाविद्यालयाच्या कॉमर्स शाखेचा निकाल १00 टक्के लागला आहे. तसेच नेरुळमधील एमजीएम ओकेशनल महाविद्यालयाचा निकाल देखील १00 टक्के लागला आहे.निकालाचा दिवस असल्याने विद्यार्थी आणि पालकांना सकाळपासूनच उत्सुकता लागली होती. दुपारी आॅनलाइन निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांनी पालकांसह शाळा गाठून शिक्षकांसमवेत जल्लोष साजरा केला.अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता नव्या उमेदीने पुन्हा अभ्यास करावा, आयुष्यात खूप मोठ्या संधी आहेत.गुण पडताळणीसाठी अर्ज करण्याची तारीख ७ जूनपर्यंत असून उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी विद्यार्थ्यांनी १७ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन विभागीय अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.>पनवेलमध्ये टक्का वाढलाआॅनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर पनवेल शहरातील सायबर कॅफे त्याचबरोबर महाविद्यालयाच्या आवारात मोबाइलवर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दीकेली होती.पनवेल तालुक्यातील व्ही. के. हायस्कूल विज्ञान शाखेचा ९२.५४ टक्के, कला शाखेचा ७५.५४ टक्के तर वाणिज्य शाखेचा ९१.८४ टक्के निकाल लागला आहे. त्याचबरोबर चांगू काना ठाकूर विज्ञान शाखेचा ९७.६५ टक्के, कला शाखा ९६.६१ टक्के, वाणिज्य शाखेचा ९६.३९ टक्के निकाल लागला आहे. बांठिया माध्यमिक विद्यालय विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल लागला असून कला शाखा ८६.५९ टक्के, वाणिज्य शाखेचा ९५ टक्के निकाल लागला आहे. सुषमा पाटील महाविद्यालय कामोठे विज्ञान शाखेचा १०० टक्के तर कला शाखा ६० टक्के, वाणिज्य ९७.०५ टक्के, के. एल. ई. कॉलेज कळंबोली विज्ञान शाखेत ९१.६१ टक्के, वाणिज्य ९८.७१ टक्के निकालाची नोंद झाली आहे.>कोकण विभागाचा निकाल ९३.२३%विभागवार निकालामध्ये कोकण विभागाचा निकाल ९३.२३ टक्के लागून आहे. रायगड जिल्ह्याचा निकाल ८४.९७ टक्के लागला असून सर्व शाखांच्या एकूण ३०,८३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. त्यापैकी ३०,८०१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी विशेष गुणवत्ता श्रेणीत १२६०, प्रथम श्रेणीत ६१७२, द्वितीय श्रेणीत १६,५५३ तर उत्तीर्ण श्रेणीत २१८८ असे ८४.९७ टक्के म्हणजे एकूण २६,१७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ७७.३२ टक्के मुले तर ८९.९९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.