शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

जेएनपीएकडून ९१४ पैकी ८१४ हेक्टर कांदळवनांचे क्षेत्रच हस्तांतरित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2022 21:12 IST

१०० हेक्टर जमीन अद्यापही बंदराकडेच: पर्यावरणवाद्याचा दाव्याने पोलखोल!

 मधुकर ठाकूर 

उरण : देशातील सर्वात मोठे कंटेनर पोर्ट म्हणून ओळखले जाणा-या जेएनपीएने वनखात्याला आपल्या अखत्यारीतील ८१४.३५ हेक्टर कांदळवने संरक्षण आणि संवर्धनासाठी सुपूर्द केली असली तरी हा आकडा अपूर्ण आहे.आणखी १०० हेक्टर कांदळवन क्षेत्र अद्यापही जेएनपीएने सुपुर्द केला नसल्याचा दावा पर्यावरणवाद्यांकडून केला जात आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने तीन वर्षांपूर्वी आदेशाद्वारे कांदळवनांचे संरक्षण व जतन वन विभागाद्वारे होणे आवश्यक असल्याचे बीइएजीने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर स्पष्ट केले होते.मात्र न्यायालयाच्या आदेशानंतरही कांदळवन क्षेत्राची हस्तांतरित करण्याची प्रक्रिया कुर्मगतीने सुरु होती. सिडको, एमएमआरडीए आणि अगदी जेएनपीएसारख्या शासकीय संस्थाही वन विभागाला कांदळवनांचे हस्तांतरण करण्यात दिरंगाई करीत असल्याची बाब नॅट कनेक्ट फाऊंडेशनने निदर्शनास आणली होती.  

त्यानंतर जेएनपीएने कांदळवन क्षेत्राची हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.त्यानंतर चार दिवसांपूर्वी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी ८१४ हेक्टर मॅन्ग्रोव्ह क्षेत्र महाराष्ट्र सरकारच्या मॅंग्रोव्ह सेल यांना सुपूर्द केले आहे.मात्र जेएनपीएने ९१४ हेक्टर क्षेत्रापैकी ८१४ हेक्टर कांदळवन क्षेत्रच हस्तांतरित केले आहे.१०० हेक्टर क्षेत्र अद्यापही जेएनपीएकडे असल्याचा दावा पर्यावरणवाद्यांकडून केला आहे. 

यापूर्वी आपल्या क्षेत्रातील कांदळवनांचे कोणतेही रेकॉर्ड नसल्याचा दावा करणा-या जेएनपीए बंदराने नॅटकनेक्ट फाउंडेशनच्या आरटीआय प्रतिसादामध्ये ९१४ हेक्टर खारफुटी त्याच्या हद्दीत असल्याचे मान्य केले असल्याचे नॅट कनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी निदर्शनास आणून दिले होते.जेएनपीएने आपल्या अधिकारातल्या सर्व कांदळवनांचे क्षेत्र सुपूर्द करायला  हवे. किनारपट्टीचे नैसर्गिक संरक्षक, “कार्बन सिंक्स” आणि विविध प्रकारचे मासे व खेकड्यांच्या पैदाशीची जागा असलेल्या या क्षेत्रातल्या आणखीन जागेची आवश्यकता भासल्यास मात्र यापुढे कांदळवन क्षेत्रातील जागेचा वापर करण्यासाठी जेएनपीएला उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल असे कुमार म्हणाले.

राज्य शासन आणि न्यायालय नियुक्त कांदळवन संरक्षण आणि जतन समितीने  विविध एजन्सी व कलेक्टर्सना वन विभागाला समुद्री वनांचे हस्तांतरण केले गेल्याची खात्री करण्याचे आदेश दिले आहेत.मात्र अजुनही शासकीय एजन्सी आपल्याला हवा तेवढा वेळ घेत असल्याचे श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांचा आरोप आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई