शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

महिला दिनानिमित्त शहरात मॅरेथॉनचे आयोजन; योग प्रशिक्षण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 23:40 IST

वाशी, पनवेलमध्ये अनेक कार्यक्रमांमधून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न; मोफत सुविधा व तपासण्या

नवी मुंबई : जागतिक महिला दिनानिमित्त नवी मुंबईसह पनवेल विभागात विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी योग प्रशिक्षण शिबिरासोबत आरोग्य शिबिरांचेदेखील आयोजन करण्यात आले होते.

नेरूळ येथील तेरणा हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी मोफत योग प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात नेरूळ, सीवूड, जुईनगर आदी भागांतील महिला सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेरूळ तालुका अध्यक्ष महादेव पवार आणि नूतन महिला बचतगटाच्या माध्यमातून अल्प दारात साखरवाटप करण्यात आले. नेरूळ सेक्टर २ मधील आम्रपाली असोसिएशन आणि डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कोपरखैरणे येथे आदित्य हेल्थ अ‍ॅण्ड एज्युकेशन सोसायटी व प्रतिभा इन्स्टिट्यूट आॅफ नर्सिंग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त रॅली काढण्यात आली. तसेच महिलांवर होणारे अत्याचार, अ‍ॅसिडहल्ला, स्त्रीभ्रूणहत्या याबाबत पथनाट्य सादर करून समाजामध्ये महिलांवरील अत्याचाराविरोधात लढण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी मोठ्या प्रमाणात महिलांनी व पुरु षांनी सहभाग घेतला होता.मोफत थायरॉईड तपासणी : जागतिक महिला दिनानिमित्त पनवेल येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या पुढाकाराने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल महापालिकेतील विरोधी पक्षनेते तथा जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या संकल्पनेतून व नवीन पनवेल येथील दीपक क्लिनिक लॅबोरेटरीजच्या सहयोगाने आयोेजित करण्यात आलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धकाधकीच्या जीवनामध्ये कुटुंबांमधील सर्व जबाबदारी पार पाडत असताना महिलांना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. विशेषत: थायरॉईडसारखे विकार जडतात. ही बाब लक्षात घेऊन महिला दिनाचे औचित्य साधून या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात शिबिरार्थी महिलांची मोफत थायरॉईड चाचणी करण्यात आली. या शिबिरात सहभागी महिलांना तुळशीचे रोपटे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी नगरसेविका प्रीती जॉर्ज (म्हात्रे), नगरसेविका सारिका भगत, माधुरी गोसावी, कविता ठाकूर, विद्या चव्हाण, शेकाप युवानेते जॉनी जॉर्ज, मंगेश अपराज, दीपक क्लिनिक लॅबोरेटरीजचे संचालक दीपक कुदळे, हेमा कुदळे, मुस्कान कुदळे, अंकिता माने, रितेश ठक्कर आदी उपस्थित होते.मोफत रिक्षा सेवा : धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान पनवेलतर्फे महिला दिनानिमित्त महिलांसाठी पनवेल शहरात मोफत रिक्षा सेवा ठेवण्यात आली होती. त्याला महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. महिलांना मोफत प्रवास ही वेगळी संकल्पना मांडल्याने महिलांनी या उपक्रमाचे स्वागत केले. या वेळी पोलीस उपनिरीक्षक सरिता मुसळे, वाहतूक पोलीस बी.एम. साळवी, सीमा मानकामे, संगीता सरकाळे आदी उपस्थित होते. शहरातील मिरची गल्ली नाका, विसावा हॉटेल नाका, बस स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन, सोसायटी नाका या ठिकाणी महिलांना प्रवास करण्यासाठी मोफत रिक्षाची व्यवस्था करण्यात आली होती.