शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

पनवेल पालिकेत महिलाराज, महिला बालकल्याण सभापतीसह तीन प्रभागांत महिलांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 00:13 IST

Panvel News : भाजपची एकहाती सत्ता असलेल्या पालिकेत चार प्रभाग समित्या, स्थायी समिती आणि महिला व बाळकल्याण सभापतीपदी भाजपच्या सदस्यांची निवड करण्यात आली.

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समित्या, महिला व बालकल्याण सभापतीपदाच्या निवडणुका बुधवारी पार पडल्या. भाजपची एकहाती सत्ता असलेल्या पालिकेत चार प्रभाग समित्या, स्थायी समिती आणि महिला व बाळकल्याण सभापतीपदी भाजपच्या सदस्यांची निवड करण्यात आली. चारपैकी दोन प्रभाग समितीपदी महिला नगरसेवकांची निवड करण्यात आल्याने, पनवेल महानगरपालिकेत महिलाराज पाहावयास मिळणार आहे.महिला व बालकल्याण सभापतीपदी मोनिका महानवर, अ प्रभाग समितीत अनिता पाटील, ब प्रभाग समितीत समीर ठाकूर, क प्रभाग समितीत हेमलता म्हात्रे तर ड प्रभाग समितीत सुशीला घरत यांची निवड करण्यात आली आहे. 

पनवेल महानगरपालिकेत महापौरपदी महिला विराजमान आहेत. या व्यतिरिक्त महिला व बालकल्याण सभापतींसह तीन प्रभागांत महिलांना संधी देण्यात आल्याने, पनवेल महानगरपालिकेत महिलाराज पाहावयास मिळणार आहे. बुधवारी या निवडणुका पार पडल्या.  शेकापने दोन प्रभागांत आपले उमेदवार उभे केले होते. मात्र, भाजपची एकहाती सत्ता असल्याने चारही प्रभागांत भाजपचे उमेदवार निवडून आले. माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. 

टॅग्स :panvelपनवेल