शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चाकरमान्यांच्या मतांवर ग्रामीण नेत्यांची भिस्त, नवी मुंबईमधील बैठका वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 05:29 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील नेत्यांनी मुंबईसह नवी मुंबईमधील चाकरमान्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई  - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील नेत्यांनी मुंबईसह नवी मुंबईमधील चाकरमान्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. नवी मुंबईसह पनवेलमधील बैठकांचे प्रमाण वाढले आहे. पक्षांचे नेते व उमेदवार बैठकांना उपस्थित राहून नागरिकांना गावच्या विकासाचे साकडे घालत आहेत.मुंबई, नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र व कोकणामधील चाकरमान्यांची संख्या लक्षणीय आहे. सातारा, पुणे, हातकणंगले, माढा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदार संघामध्ये चाकरमान्यांची मते निर्णायक ठरत आहेत. सातारा व माढा मतदार संघामधील अनेक गावांमधील ७० ते ८० टक्के नागरिक वास्तव्यासाठी मुंबई, नवी मुंबईमध्ये आहेत. अनेकांची दोन्ही ठिकाणी मतदार संघामध्ये नावे आहेत. यामुळे ग्रामीण भागामधील नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. शिरुर मतदार संघामधील शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही वाशीमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकांचे आयोजन केले होते. याशिवाय माढा मतदार संघामधील कार्यकर्त्यांचा व माथाडी कामगारांचा मेळावा राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये कळंबोलीमध्ये आयोजित केला होता. या मेळाव्यामध्येही माथाडी कामगारांना गावाकडे चलाचे आवाहन करण्यात आले होते. सातारा - जावली मतदार संघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एक महिन्यामध्ये दोन वेळा नवी मुंबईमध्ये हजेरी लावून कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. सातारा व पुणे जिल्ह्यामधील चाकरमान्यांच्या विभागनिहाय बैठका घेतल्या जात आहेत. यावेळी मुंबई व गावाकडील मतदानाच्या तारखा वेगवेगळ्या आहेत. यामुळे सर्वप्रथम गावी येवून मतदानामध्ये सहभाग घ्यावा. गावच्या विकासामध्ये सर्वांचे योगदान हवे, असे भावनात्मक आवाहन केले जात आहे.यापूर्वी गावाकडील पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गावचे राजकारण चालत होते, परंतु मागील काही वर्षांमध्ये परिस्थिती बदलली आहे. मुंबईमध्ये रोजीरोटीसाठी आलेल्या नागरिकांनी आर्थिक प्रगती केल्याने गावच्या राजकारणामध्ये चाकरमान्यांच्या मताला महत्त्व प्राप्त झाले आहे. २००० च्या विधानसभा निवडणुकीमध्ये माथाडी कामगारांनी गावी जाऊन निकाल बदलला होता. तेव्हापासून ग्रामीण नेत्यांनी मुंबईमधील चाकरमान्यांशी संवाद वाढविण्यास सुरुवात केली. मुंंबईकरांचे मत वळविले की पूर्ण गावचे मत वळते असे समीकरण अनेक ठिकाणी निर्माण झाल्यामुळेच सर्वच राजकीय पक्षांनी मेळावे व बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईकरांना गावी घेऊन जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यापासून सर्व प्रकारची मदत देण्याची तयारीही दाखविली जात आहे. राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना व भाजपाने चाकरमान्यांची मते मिळविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली असून ही मते नक्की कोणाच्या वाट्याला येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शिरुरमध्ये लागणार कसोटीसातारा, माढा, हातकणंगले, रत्नागिरी - सिंधुदुर्ग, शिरुर, बारामती मतदार संघामध्ये चाकरमान्यांची मते निर्णायक ठरत आहेत. या मतदार संघामधील नवी मुंबई, पनवेल, ठाणे व मुंबईमध्ये वास्तव्यास असलेल्यांची संख्या जास्त आहे. गावाकडील व मुंबई, नवी मुंबईमधील मतदानाची तारीख वेगळी असल्यामुळे उमेदवारांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. फक्त शिरुर व मुंबई, नवी मुंबईमधील मतदान एकाच दिवशी असल्यामुळे त्या मतदार संघातील उमेदवारांची मतदार गावी घेऊन जाण्यासाठी कसोटी लागणार आहे.माथाडी मेळाव्याकडेही लक्ष२३ मार्चला माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांची पुण्यतिथी आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये माथाडी मेळाव्यामधून राष्ट्रवादी काँगे्रसच्या प्रचारास आरंभ केला जात होता. यावर्षी माथाडी संघटना भाजपा व राष्ट्रवादी अशा दोन पक्षांमध्ये विभागली आहे. यामुळे माथाडी मेळाव्यामध्ये नक्की कोणती भूमिका घेतली जाणार याविषयी उत्सुकता असून कामगार माथाडी नेत्यांचे ऐकणार की स्वत:ची भूमिका स्वत: ठरविणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान