शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

...तरच नवी मुंबई विमानतळाला परवाना; डीजीसीए संचालकांचे सामाजिक संस्थेला उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 12:23 IST

उलवेतील बेकायदा कत्तलींबाबत तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या १० किमी परिसरात येणाऱ्या उलवेतील बेकायदेशीर कत्तलीबाबत  नॅटकनेक्ट फाउंडेशनने तक्रार केली होती. याची नागरी विमान वाहतूक संचालकांनी दखल घेतली असून, धावपट्टीजवळील बेकायदेशीर कत्तलीबाबत चिंता व्यक्त केली आहे. विमानतळास परवाना देण्यापूर्वी येथील कत्तलखान्यांची पूणर्तपासणी करण्याचे आश्वासन संचालकांनी दिले आहे. 

रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळाजवळ विमानाच्या टेक ऑफ आणि लॅंडिंगदरम्यान पक्ष्यांचा धोका असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर नॅटकनेक्ट फाउंडेशचे संचालक बी. एन. कुमार यांनी डीजीसीएला पुन्हा स्मरणपत्र पाठवले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाससुद्धा पक्ष्यांचा धोका असून, परिसरात सुरू असलेल्या प्राण्यांच्या बेकायदेशीर कत्तलीमुळे तो वाढल्याचे निदर्शनास आणले होते. त्यावर डीजीसीएचे संचालक अमित गुप्ता यांनी कुमार यांच्या तक्रारीची पूणर्तपासणी करूनच विमानतळास परवाना देण्यात येणार असल्याचे उत्तर दिले आहे. उलवे नोडचे व्यवस्थापन सिडको करत असून, तेथे बेकायदेशीर कत्तल आणि विक्री वाढत असताना अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप कुमार यांनी आरोप केला आहे. 

गंभीर प्रश्न गायब

विमानतळाच्या परिघात बेकायदेशीर कत्तलीशी संबंधित मुद्दा नोटम यादीतूनसुद्धा गायब असून ज्यामध्ये लँडिंग आणि टेक-ऑफ मार्गांचा अभाव आणि ८६ इमारती, ७९ टेकड्या, २३ पॉवर ट्रान्समिशन टॉवर, १२ मोबाइल टॉवर आणि आठ फ्लडलाइट पोलसह २२५ अडथळ्यांचा उल्लेख आहे. मात्र, कत्तलीचा प्रश्न गायब असल्याने बी. एन. कुमार यांनी चिंता व्यक्त केली आहे.

‘या’ कारणामुळे टेकऑफ, लॅंडिंगच्या वेळी धोका

पीएमओच्या सार्वजनिक तक्रार संकेतस्थळावर प्राण्यांच्या कत्तलीचा कचरा, विक्री आणि ढीग यामुळे मोठे पक्षी आकर्षित होऊन ते उड्डाण विमानाच्या लँडिंग आणि टेकऑफवेळी टक्कर देऊ शकतात, असे आपल्या पत्रात म्हटले होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवती वन्यजीवांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी एअरोड्रोम ऑपरेटरकडून कारवाई सुरू असल्याचे सांगून डीजीसीए संचालक गुप्ता यांनी हे प्रकरण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे सुद्धा पाठविल्याचे कुमार यांनी सांगितले. 

टॅग्स :Airportविमानतळ