नवी मुंबई : नवी मुंबई शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून शहरातील सोसायट्यांमध्ये घरकाम करणाºया महिलांना एंट्री बंद करण्यात आली असून, लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्यानंतरही अनेक सोसायट्यांमध्ये घरकाम करणाºया महिलांना प्रवेश देण्यात येत नाही. त्यामुळे घरातील कामे करताना ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत.नवी मुंबई शहरात कोरोनाबाधित रुग्णांचे आकडे दररोज वाढत आहेत. सोसायट्यांमधील नागरिकांना कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी सोसायटीमधील पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन नियमावली तयार केली आहे. अनेक सोसायट्यांमध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश नाही.।काही पदाधिकाºयांनी सोसायटीमध्ये वास्तव्य करणाºया ज्येष्ठ नागरिकांकडे घरकाम करणाºया महिलांना प्रवेशासाठी मुभा दिली. यामध्ये महिलांची आरोग्य तपासणी केल्याचे पत्र घेतले असून, मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोसायटीच्या प्रवेशद्वारावर त्यांची स्क्रीनिंग केली जात असून, ये-जा करण्याची नोंद होते.
घरकाम करणाऱ्या महिलांना काही सोसायट्यांचीच परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 00:27 IST