शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल पालिकेच्या ताफ्यात केवळ ११ रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 00:42 IST

खाजगी ॲम्ब्युलन्स ताब्यात घेऊन आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची गरज

पनवेल : पनवेल महानगरपालिका परिसरात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आजच्या घडीला पालिका क्षेत्रात एकूण २,५५० कोविडबाधित रुग्ण आहेत. दिवसेंदिवस या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोणत्याही क्षणी रुग्णसंख्येचा भडका उडण्याची शक्यता आहे. याकरिता पालिकेने आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. सध्याच्या घडीला पालिकेकडे केवळ ११ रुग्णवाहिका आहेत. याव्यतिरिक्त शेकडो खाजगी रुग्णवाहिका पालिका क्षेत्रात कार्यरत आहेत.पालिकेच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयात २, इंडिया बुल्स कोविड सेंटर २ तसेच नुकत्याच नव्याने सुरू झालेल्या कळंबोली कोविड केअर सेंटरमध्ये १ रुग्णवाहिका आहे. या रुग्णवाहिकांचा वापर बहुतांशी वेळेला कोविडची बाधा झालेल्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी होत असतो. याव्यतिरिक्त कोविडने मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांनादेखील या रुग्णवाहिकांद्वारेच अंत्यविधीसाठी पोहोचविले जाते. दिवसरात्र २४ तास या पालिकेच्या मालकीच्या रुग्णवाहिका कार्यरत असतात. इंडिया बुल्स क्वारंटाईन सेंटर हे पनवेल शहरापासून लांब असल्याने या ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था असलेली एक रुग्णवाहिका आहे. जेणेकरून रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता भासली तर या रुग्णवाहिकेचा उपयोग होईल. याव्यतिरिक्त सध्याच्या घडीला शासकीय केंद्रावर लसीकरण सुरू आहे. पालिकेच्या माध्यमातून खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल, नवीन पनवेल आदी ठिकाणच्या नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ऑक्सिजनची व्यवस्था असलेल्या सहा रुग्णवाहिका आहेत. लसीकरणावेळी अत्यावश्यक परिस्थिती ओढवल्यास या रुग्णवाहिकांचा वापर करता येणार आहे. सध्याच्या घडीला कोविड रुग्ण वाढले असले तरी बहुतांशी रुग्ण घरीच उपचार घेऊन बरे होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालिका क्षेत्रातील परिस्थिती अद्यापपर्यंत तरी नियंत्रणात आहे. उपजिल्हा रुग्णालय व इंडिया बुल्स कोविड सेंटरमध्ये केवळ १४६ रुग्ण आहेत.द्यावी लागते नियमबाह्य रक्कम पालिकेच्या रुग्णवाहिकांव्यतिरिक्त पालिका क्षेत्रात शेकडो रुग्णवाहिका आहेत. यामध्ये रुग्णालयांच्या मालकीच्यादेखील रुग्णवाहिका आहेत. रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध होत असल्या तरी कोविड काळात खाजगी रुग्णवाहिका चालक आपल्या पद्धतीने भाड्याची आकारणी करीत असतात. विशेषतः कोविड काळात रुग्णांना दवाखान्यात दाखल करण्यास जवळचे नातेवाईकदेखील पुढे येत नसल्याने नाइलाजास्तव अनेक जण वाट्टेल ती नियमबाह्य रक्कम रुग्णवाहिका चालकांना देत आहेत. पालिकेच्या अखत्यारीत या रुग्णवाहिका येत नाहीत. या रुग्णवाहिकांवर थेट प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे नियंत्रण असल्याने याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने संबंधित रुग्णवाहिका चालकांना योग्य त्या सूचना देणे गरजेचे आहे.

पालिकेच्या माध्यमातून खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल, नवीन पनवेल आदी ठिकाणच्या नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ऑक्सिजनची व्यवस्था असलेल्या सहा रुग्णवाहिका आहेत.