शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिकांना ऑनलाइन व्यासपीठ, पनवेल महानगरपालिकेकडून सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 02:58 IST

सध्याच्या आधुनिक युगात प्रत्येक गोष्ट आॅनलाइन झाली आहे. आपला व्यवसाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सध्याच्या घडीला विविध आॅनलाइन पोर्टलची मदत घेतली जाते.

- वैभव गायकरपनवेल : सध्याच्या आधुनिक युगात प्रत्येक गोष्ट आॅनलाइन झाली आहे. आपला व्यवसाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सध्याच्या घडीला विविध आॅनलाइन पोर्टलची मदत घेतली जाते. यासाठी वाटेल ती रक्कम मोजण्याची तयारी व्यावसायिकाची असते. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेने दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अंतर्गत शहर उपजीविका केंद्राची वेबसाइट व मोबाइल अ‍ॅप्लिकेशन सुरू केले आहे. याअंतर्गत पनवेलमधील लहान-मोठ्या व्यावसायिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.ही योजना केवळ कागदोपत्री न राहता, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी त्याला आधुनिक स्वरूप प्राप्त करून दिले आहे. त्यासाठी मोबाइल अ‍ॅप्लिकेशन सुरू करण्यात आले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील उद्योजक, नागरिक, सामाजिक संस्था, बचतगट, हाउसिंग सोसायटी, गृहिणी तसेच विद्यार्थ्यांना हे अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करता येणार आहे. या अ‍ॅप्लिकेशनद्वारे आपल्या व्यवसायाची आॅनलाइन नोंदणी करून वस्तू व सेवेची मोफत प्रसिद्धी तसेच आर्थिक उन्नती करता येणार आहे. बचतगटाद्वारे भरविण्यात आलेला मेळावा, शाळा-कॉलेज फेस्ट२ आदीची प्रसिद्धी या ठिकाणी करता येणार आहे. विशेष म्हणजे, प्लम्बरपासून लहान मोठ्या व्यावसायिकांना या सुविधेचा मोठा लाभ होणार आहे.महिनाभरात ४६९ जणांनी हे अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड केले आहे. यापैकी अद्याप ११८ जणांनी आपल्या व्यवसायाची नोंदणीसुद्धा केली आहे. दरम्यान, अधिकाधिक लोकांनी हे अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करून आपल्या व्यवसायाची नोंदणी करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.पनवेल महानगरपालिकेचा विस्तार मोठा आहे. पनवेल शहर हे नव्याने विकसित होत आहे. त्या दृष्टीने नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. मात्र, यापासून विखुरलेल्या लोकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेने पाऊल उचलेले आहे. नागरिकांनी याअ‍ॅप्लिकेशनमध्ये नोंदणी करून आपल्या व्यवसायाच्या सीमा वाढवाव्यात.- जमीर लेंगरेकर,उपायुक्त, पनवेल महानगरपालिका

टॅग्स :panvelपनवेल