शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

पनवेलमध्ये घरगुती बाप्पाच्या ऑनलाइन बुकिंगला सुरुवात; कोरोनामुळे मागणीही घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 00:17 IST

स्टॉलला परवानगी नसल्याने विक्रेते नाराज

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : कोरोनामुळे या वर्षी गणेशोत्सवावर विरजण पडले आहे. बाप्पांचे अगमन जवळ आले, तरी बाजारात कोणतीही लगबग दिसत नाही. गणपती स्टॉलचाही पत्ता नाही. त्यामुळे अनेक कारागिरांनी बाप्पाच्या मूर्तीची विक्री आॅनलाइनद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेल परिसरात या आॅनलाइन नोंदणीला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहेत. सध्या बाप्पाची वेगवेगळी रूपे व्हॉट्सअ‍ॅप, पीडीएफ फाइलद्वारे ग्राहकांना पाठवून आॅनलाइन बुकिंग केली जात आहे.

गणेशोत्सवाच्या तीन ते चार महिने अगोदर मूर्तिकार गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामाला सुरुवात करतात. परंतु यंदा करोनामुळे चार महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. याचा फटका कारागिरांनाही बसला आहे. कच्च्या मालापासून ते मूर्ती विक्री करेपर्यंत बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. पनवेल परिसरात कुंभारवाडा येथे तीन, तर भिंगारी येथे सात मूर्ती बनविण्याचे कारखाने आहेत. या कार्यशाळेत बारा महिने काम चालते.

लॉकडाऊन आणि शासनाने मूर्तीच्या उंचीवर घातलेल्या मर्यादा, यामुळे पनवेल परिसरातील मोठे गणेशोत्सव मंडळांनी या वर्षी उत्सवच रद्द केला आहे. त्यामुळे कारागिरांनी अर्ध्या फुटापासून दोन ते अडीच फुटांपर्यंतच्या घरगुती मूर्ती बनविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे आपोआपच मोठ्या मूर्तींची मागणी कमी झाली आहे, तसेच बाजारात स्टॉलसाठी महापालिकेने अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मूर्तिकारांनी व्हॉट्सअ‍ॅप, पीडीएफच्या माध्यमातून आॅनलाइन बुकिंग सुरू केली आहे.

दरवर्षी घरीही तीन ते चार फुटापर्यंतच्या मूर्तीची स्थापना केली जाते. मात्र, या वर्षी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या आर्थिक टंचाईचा विचार करून, बहुतांशी भाविकांनी लहान मूर्तींची स्थापना करण्याचा निर्णय घेतल्याचे हितेश पंड्या या भाविकांनी सांगितले.

गुंतवलेले भांडवल निघाले, तरी समाधान

पनवेल परिसरातील भिंगारी आणि कुंभारवाडा येथील १० कारखाने हे पारंपरिक वारसाद्वारे चालवले जातात. या कारखान्यात वर्षभर कामे चालतात. त्यांचा उदरनिर्वाह हा मूर्ती बनवण्यावर अवलंबून आहे. परंतु यंदा कोरोनामुळे मोठी आर्थिक हानी झाली आहे. बनवलेल्या मूर्तीही विकल्या जातील की नाही, याची चिंता सतावत आहे. कोरोनामुळे गणेशमूर्ती बनविण्यासाठी लागणारे रबरी साचे, प्लॅस्टर आॅफ पॅरिस त्यासाठी लागणारे वेगवेगळे रंग यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्या प्रमाणात गणेशमूर्तींना किंमत मिळणे अवश्यक आहे. मूर्ती बनवण्यासाठी गुंतवलेले भांडवल निघाले, तरी भरपूर आहे, अशी भावना केतन मांगरुळकर या कारागिराने व्यक्त केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईGanesh Mahotsavगणेशोत्सव