शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
2
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
5
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
6
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
7
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
8
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
9
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
10
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
11
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
12
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
13
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
14
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
15
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
16
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
17
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
18
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
19
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
20
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 

दुर्बल गटांच्या आरक्षित जागांसाठी आॅनलाइन प्रवेश

By admin | Updated: March 2, 2015 23:07 IST

प्रत्येक पालकाचा आपल्या पाल्याने नामांकित शाळांमध्ये शिकले पाहिजे, असा आग्रह असतो. मात्र, वंचित आणि दुर्बल गटांतील मुलांना तेथे प्रवेश मिळत नाही.

ठाणे : प्रत्येक पालकाचा आपल्या पाल्याने नामांकित शाळांमध्ये शिकले पाहिजे, असा आग्रह असतो. मात्र, वंचित आणि दुर्बल गटांतील मुलांना तेथे प्रवेश मिळत नाही. म्हणून ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने या गटांच्या राखीव २५ टक्क्यांसाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यातील महापालिका (अर्बन) भागात हाती घेतली आहे. जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.जिल्हा विभाजनानंतर ठाणे जिल्ह्यात सहा तालुके असून येथील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर आणि नवी मुंबई या सहा महापालिकांतील ४०१ खाजगी आणि विनाअनुदानित शाळा आहेत. त्यामध्ये वंचित आणि दुर्बल गटांतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही, अशा तक्रारी प्राथमिक शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. यावरील उतारा म्हणून महापालिका हद्दीतील शाळांचे सर्वेक्षण करून २५ टक्के आरक्षित जागांसाठी आॅनलाइन प्रवेशची मात्रा राबवली जाणार आहे. २८ फेब्रुवारी ते ११ मार्चपर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार आहेत. ६६६.१३ी25ंे्रि२२्रङ्मल्ल.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरायचा आहे. यासाठी जातीचा, ४० पेक्षा जास्त अपंगत्वाचा, उत्पन्न, जन्मतारीख आणि रहिवासी पुरावा हे दाखले ग्राह्यमानले जातील. त्यामुळे एससी, एसटी आणि १ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश अर्ज भरण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचा हा पहिलाच प्रयोग असून अर्बन भागात आॅनलाइन तर ग्रामीण भागात आॅफलाइन पद्धतीने प्रवेश घेता येणार आहेत. तसेच २५ टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यास तेथे १७ किंवा १८ मार्चला लकी ड्रॉ घेतला जाणार आहे.- मीना यादव-शेंडकर, शिक्षणाधिकारी, ठाणे जिल्हा परिषद, प्राथमिक विभाग४जिल्ह्यातील ग्रामीण भागात आॅफलाइनद्वारे प्रवेश दिला जाणार आहे. ४ही प्रक्रिया १ मार्चपासून सुरू होणार असली तरी २ ते ७ मार्चदरम्यान प्रवेश अर्ज घेऊन ते तेथे भरून द्यायचे आहेत. ही प्रक्रिया शाळांद्वारे राबवली जाणार आहे.आॅनलाइनच प्रवेशपत्र मिळणार४अर्ज भरताना मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे. त्यावर मेसेज येणार असून तो आल्यावर पुन्हा संकेतस्थळावर जाऊन प्रवेशपत्र घ्यावयाचे आहे. त्यानंतर, शाळेत प्रवेश मिळणार आहे. महापालिकाशाळा संख्याठाणे१३०नवी मुंबई१०६भिवंडी२६कल्याण-डोंबिवली५१उल्हासनगर१८ मीरा-भार्इंदर७० एकूण४०१