शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोविरोधात ओएनजीसी उच्च न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 01:28 IST

पनवेल तालुक्यातील काळुंद्रे येथे कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी दिलेल्या ४७ हेक्टर जमिनीचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत, सिडकोने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीला

कमलाकर कांबळे  नवी मुंबई : पनवेल तालुक्यातील काळुंद्रे येथे कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी दिलेल्या ४७ हेक्टर जमिनीचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत, सिडकोने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीला ओएनजीसीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ओएनजीसीने करारनाम्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याचा ठपका सिडकोने ठेवला आहे. त्यामुळे दिलेली जागा परत का घेऊ नये, अशी विचारणा सिडकोने ओएनजीसीकडे केली आहे. सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची जमीन हातची जाऊ नये, यासाठी ओएनजीसीने सिडकोच्या या निर्णयाविरुद्ध आता उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.नवी मुंबई शहराची उभारणी सुरू झाल्यानंतर या परिसरात एमआयडीसी, ओएनजीसीसारखे प्रकल्प कार्यान्वित झाले. ओएनजीसीला आपल्या कर्मचाºयांसाठी निवासस्थाने उभारण्यासाठी सिडकोने सीबीडी येथे दिलेली जागा मागील ३० ते ३५ वर्षांपासून वापराविना पडून आहे. सर्वप्रथम फेज-१ मध्ये सिडकोने दिलेली २८ हेक्टर जागा ओएनजीसीने हौसिंग कॉलनीसाठी विकसित केली. त्यानंतर फेज-२ मध्ये निवास वापरासाठी दिलेल्या ३२.४७ हेक्टर जागेपैकी फक्त ५० टक्के जागा आतापर्यंत ओएनजीसीने विकसित केली आहे. तर ५० टक्के जागेचा वापर होणे अद्याप बाकी आहे, असे असताना १९८५ साली फेज-३ मध्ये सिडकोने ओएनजीसीला पनवेल इथल्या काळुंद्रे परिसरात पुन्हा ४७.४१ हेक्टर जागा निवासी वापरासाठी दिली; परंतु गेल्या ३० वर्षांत या जागेचा ओएनजीसीने कोणताही विकास केलेला नाही. त्यामुळे सिडको महामंडळाने सन २०११-१२पासून ओएनजीसीला जागा उपयोगात आणण्यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस (शोकॉज) बजावण्यास सुरु वात केली. त्यानंतर ओएनजीसीने सिडकोला पत्र लिहून काळुंद्रे येथील जागेवर हॉस्पिटल किंवा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याची परवानगी मागितली. मात्र, या जागेचा वापर हा फक्त निवासी वापरासाठी असल्याचे २०१५मध्ये सिडकोने स्पष्ट करून वापरात बदलाला नकार दर्शविला. तेव्हापासून आजतागायत ओएनजीसीने या जागेवर निवासी प्रकल्प उभारण्यासंदर्भात काहीच हालचाली केल्या नाहीत. अखेरीस गेल्या सप्टेंबर महिन्यात सिडकोने ओएनजीसीला अंतिम नोटीस बजावताना एक महिन्याच्या आत काळुंद्रे येथील ४७ हेक्टर जागा परत देण्याचे निर्देश दिले होते.दरम्यान, या प्रकरणी उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करताना सदर जागा स्वत:च्या ताब्यात घेणार असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.