शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रिटघरमध्ये ‘एक गाव, एक गणपती’, ४३ वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 05:12 IST

पनवेल तालुक्यातील रिटघर या गावामध्ये ४३ वर्षांपासून एकच गणपती बसविण्याची परंपरा आहे. जवळपास बाराशे लोकसंख्या असलेल्या गावात सर्व जण मतभेद विसरून गणपतीच्या आरतीला

पनवेल : पनवेल तालुक्यातील रिटघर या गावामध्ये ४३ वर्षांपासून एकच गणपती बसविण्याची परंपरा आहे. जवळपास बाराशे लोकसंख्या असलेल्या गावात सर्व जण मतभेद विसरून गणपतीच्या आरतीला, तसेच गणेशाच्या सेवेला हजर होतात. २०१६चा विघ्नहर्ता पुरस्कारदेखील या रिटघरच्या राजाला मिळाला आहे.रिटघर येथे १९७४मध्ये पहिल्यांदा एक गाव, एक गणपतीची संकल्पना मांडण्यात आली व त्याच वर्षापासून गावातील मंदिरात एक गणपती बसविण्यात आला. अनाठायी होणारा खर्च कमी व्हावा व आनंदाची प्राप्ती व्हावी, तसेच संपूर्ण गाव एकत्रित यावा, यासाठी हभप भागोजी महाराज सांगडे, परळी वैजनाथ पांडुरंग महाराज, हभप धोंडू भोपी, बाळू भोपी, शंकर भोपी, मुंगा पाटील (सर्व मयत) यांनी एक गाव, एक गणपती सुरू केला. गावातील हनुमान मंदिरात दरवर्षी गणेशाची मूर्ती बसविली जाते. मंदिरात सर्व अबालवृद्ध, ग्रामस्थ, लहान-मोठे, महिला हजर असतात. यंदा पंढरपूरचा देखावा साकारण्यात आला आहे.सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सोहळ्यात वारकरी सांप्रदायिक परंपरेच्या कार्यक्रमांतर्गत आरती, पारायण, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, जागर, काकडा, ज्ञानेश्वरी पारायण अशा पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ग्रामीण भागात शक्यतो घरोघरी गणपती बसविण्याची प्रथा आहे. मात्र, रिटघर गावाने ‘एक गाव, एक गणपती’ ठेवून समाजापुढे एक वेगळाच आदर्श ठेवला आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये गावातील ग्रामस्थ भजन, कीर्तन, आदींसह परंपरागत बाल्या नृत्याचे कार्यक्रम या ठिकाणी करत असतात. गावातील प्रत्येकाला गणेशाच्या सेवेचा लाभ मिळावा म्हणून काही घरांतील नागरिकांना गणपतीच्या सेवेसाठी नेमले जाते.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव