शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रकिनारी कायमस्वरूपी नगर परिषदेचा एक कर्मचारी

By admin | Updated: February 4, 2016 02:38 IST

पुण्यातील १४ विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने प्रसारमाध्यमांकडून मुरुड नगर परिषदेच्या कारभाराचे वाभाडे काढण्यात आले.

नांदगाव : पुण्यातील १४ विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने प्रसारमाध्यमांकडून मुरुड नगर परिषदेच्या कारभाराचे वाभाडे काढण्यात आले. शहरातील या समुद्रकिनारी जीवरक्षक तसेच गोवा धर्तीवर असणारे मनोरे तसेच दुर्बीण नसल्याची टीका चोहोबाजूने करण्यात आली होती. यासंदर्भात मुरुड नगर परिषदेमार्फत तातडीने पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. समुद्रातील जो धोकादायक स्पॉट आहे तिथे पर्यटकांनी पोहण्यास जाऊ नये, यासाठी मुरुड नगर परिषदेचा एक कर्मचारी कायमस्वरूपी नियुक्त करण्यात येऊन त्याच्या जोडीला होमगार्ड पोलीसही नियुक्त करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी वंदना गुळवे यांनी दिली.नगरसेवक संदीप पाटील म्हणाले की, मुरुड समुद्रकिनारी अशा दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी लवकरच स्थानिकांसह पत्रकारांना सोबत घेऊन त्यावर विचारविनिमय करून ठोस उपाययोजना करणार आहोत. ग्रोऐन्स बंधाऱ्यासाठी सर्व नगरसेवक प्रस्ताव तयार करून पाठपुरावा करू, असेही त्यांनी सांगितले. मुरुड शहरात पर्यटकांनी प्रवेश करताच धोकादायक स्पॉटचे चित्र व येथे पोहू नये, अशा संदेशाचे पत्रक वाटण्याची संकल्पना महेश भगत यांनी व्यक्त केली. डिजिटल बॅनरद्वारे जनजागृतीचा संकल्प जाहीर केला. मुरुड नगर परिषद कायमस्वरूपी जीवरक्षक नेमू शकत नाही. कारण ही पदे मंजूर नाहीत. गणपती विसर्जन, नवरात्रोत्सव काळात हंगामी स्वरूपात जीवरक्षक नेमले जातात, अशी माहिती गुळवे यांनी दिली. स्वयंसिध्द लॉजच्या मागील समुद्र धोकादायक आहे. त्या ठिकाणी फलक लावणार असून, प्रतिबंधित भाग म्हणून मेरीटाइम बोर्ड व नगर परिषदेकडून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. नगराध्यक्ष अशोक लुमाल, नगरसेवक महेश भगत, संदीप पाटील, रहिब कबले, संजय गुंजाळ आदी यावेळी उपस्थित होते.(वार्ताहर)