टेंडर घोटाळ्याप्रकरणी एकाला अटक; बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींचे काम मिळवण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 11:48 PM2021-02-24T23:48:21+5:302021-02-24T23:48:34+5:30

बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींचे काम मिळवण्याचा प्रयत्न

One arrested in tender scam case | टेंडर घोटाळ्याप्रकरणी एकाला अटक; बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींचे काम मिळवण्याचा प्रयत्न

टेंडर घोटाळ्याप्रकरणी एकाला अटक; बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींचे काम मिळवण्याचा प्रयत्न

googlenewsNext

नवी मुंबई : बनावट कागदपत्रांद्वारे शालेय साहित्य खरेदीचे काम मिळवल्याप्रकरणी एनआरआय पोलिसांनी एकाला अटक केली आहे. २०१८ मध्ये तक्रारदार यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात इतरही खासगी व्यक्ती व पालिका अधिकारी अडकण्याची शक्यता आहे. 

महापालिकेच्या शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य पुरवण्यासाठी २०१६,२०१७ व २०१८ मध्ये पालिकेकडे आठ कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी काही कंपन्या ठरावीक व्यक्तींच्याच होत्या. त्यांच्याकडून कामाचा पूर्वानुभव असल्याचे नामांकित संस्थांचे बनावट प्रमाणपत्रे जोडली होती.

संतोष काळे व सुधीर पवार यांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर त्यांनी पालिकेकडे तक्रार केली. परंतु पालिकेने दखल न घेतल्याने काळे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने कारवाईचे आदेश काढताच जून २०१८ मध्ये एनआरआय पोलीस ठाण्यात ७ ठेकेदार कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल झाला. परंतु गुन्हा दाखल होऊनही संबंधितांना अटक होत नसल्याने काळे यांनी पुन्हा न्यायालयाकडे तक्रार केली होती. अ

खेर एनआरआय पोलिसांनी जयंतीलाल राठोड (७२) यास अटक केली आहे. गुन्हा दाखल असलेल्या सातपैकी तीन ठेकेदार कंपन्या त्यांच्या आहेत. एक दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. या प्रकरणात ठेकेदारांसह पालिकेचे तत्कालीन अधिकारी व कर्मचारी यांचाही सहभाग असल्याचा आरोप सुधीर पवार यांनी केला आहे. तर या प्रकरणात पोलिसांवर तपासात दडपण असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

मात्र या ठेकेदारांनी यापूर्वी बनावट कागदपत्रे सादर करून ठेका मिळवलेला असल्याने संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यास कोट्यवधींचा अपहार उघड होऊ शकतो. त्यात अनेक अधिकाऱ्यांच्यादेखील सहभाग  उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र पालिकेने बनावट कागदपत्रांद्वारे मिळवलेला ठेका रद्द करून अपहार झालाच नाही, असा कांगावा करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

Web Title: One arrested in tender scam case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.