शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ईडीच्या रडारवरील कंपनीकडून कोट्यवधींचा गंडा; एसपीव्हीएसच्या प्रमुखांवर गुन्हा

By सूर्यकांत वाघमारे | Updated: February 22, 2024 09:05 IST

दामदुप्पटच्या बहाण्याने राज्यभरात धुमाकूळ

नवी मुंबई : फॉरेक्स ट्रेडिंगचा बहाण्याने कोट्यवधीं रुपये गोळा करून एसपीव्हीएस कंपनीच्या प्रमुखांनी धूम ठोकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या प्रमुखांवर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. तर कंपनीच्या प्रमुखांनी धूम ठोकली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दामदुपट्टच्या बहाण्याने त्यांनी राज्यभरातून शेकडो कोटी रुपये जमा केल्याचे समोर येत आहे. मात्र सहा महिन्यांपासून कंपनीकडून मोबदला मिळायचा बंद झाल्याने अखेर गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.

नियम डावलून दामदुप्पटच्या नावाखाली बेकायदेशीर ठेवी गोळा करणाऱ्या एसपीव्हीएस कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या कंपनीच्या प्रमुखांनी एजंटच्या माध्यमातून राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांकडून शेकडो कोटी रुपये खात्यावर अथवा रोखीने घेतले आहेत. मागील काही वर्षांपासून एसपीव्हीएसच्या माध्यमातून दामदुप्पट योजना चालवली जात होती. परंतु पुणेत ईडी मार्फत दाखल असलेल्या गुन्ह्यानंतर एसपीव्हीएस कंपनी देखील ईडीच्या रडारवर आली. तेंव्हापासून एपीएमसी व महापेतले कार्यालय बंद करून कंपनीचे प्रमुख सचिन डोंगरे, विकास निकम भूमिगत झाले आहेत. मात्र काही एजंटच्या ते नियमित संपर्कात आहेत. यामुळे कोपर खैरणेत राहणारे गुंतवणूकदार गणेश गोगावले व त्यांच्या सहकाऱ्यांनी पैशाच्या परताव्यासाठी तगादा लावला होता. परंतु एजंटकडून मिळणारी उडवाउडवीची उत्तरे, धमक्या याला कंटाळून अखेर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.

सुप्रिया पाटील व सतीश गावंड यांच्या प्रकरणानंतर हे प्रकरण देखील गांभीर्याने घेऊन पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, अतिरिक्त आयुक्त दीपक साकोरे यांनी "फायनान्शियल इंटेलिजन्स" विभागाला चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सतीश जाधव, सहायक निरीक्षक अमोल शिंदे यांच्या पथकाने घणसोलीत छापा टाकून मॅनेजर भगवान कोंढाळकर, दीपाली कोंढाळकर, सागर बोराटे यांना ताब्यात घेतले. चौकशीअंती त्यांच्यावर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून भगवान व सागर यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २७ फेब्रुवारी पर्यंतची पोलिस कोठडी दिली असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा एककडे सोपवण्यात आला आहे.

गुंतवणुकीत पोलिसही गुंतले.

सागर व इतर एजंटच्या माध्यमातून अनेक पोलिसांनी दुप्पट रक्कम मिळावी यासाठी कंपनीत लाखो रुपये गुंतवले आहेत. त्यापैकी काही हवालदारांचे "बेहिशोबी" कोटी रुपये आहेत, तर काहींनी कर्ज काढून कुटुंबियांच्या नावे रक्कम गुंतवलेली आहे. परंतु चौकशीची बला टाळण्यासाठी ते मौन धरून आहेत. 

गुंतवणूकदारांना धमक्या. 

अनेक गुंतवणूकदारांना तारखेवर तारीख देऊन एजंट मार्फत गप्प केले जात आहे. तर जे विरोधात जाण्याचा प्रयत्न करतील त्यांना एजंट धमकी देत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांचा आकडा हजारोच्या घरात असतानाही तक्रारदार पुढे आलेले नाहीत. त्यामुळे अधिकाधिक गुंतवणूकदारांनी तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.