शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

महापालिकेची एकीकडे घाई दुसरीकडे दिरंगाई; कार्यादेश मिळूनही काम रखडले

By सूर्यकांत वाघमारे | Updated: January 13, 2024 16:57 IST

स्मशानभूमी, दफनभूमीच्या जागेवर डोळा ?

नवी मुंबई : रबाळे एमआयडीसी मध्ये स्मशानभूमी, दफनभूमी बांधण्याचे ठेकेदाराला कार्यादेश मिळूनही एक वर्षांपासून प्रत्यक्षात कामाला सुरवातच झालेली नाही. त्यामुळे या भूखंडावर कोणाचा डोळा आहे का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. तर याच परिसरात महापालिकेने एमआयडीसीच्या भूखंडावर विनापरवाना शाळा उभारण्याची घाई केली असताना, स्मशानभूमी व दफनभूमीसाठी मात्र दिरंगाई होताना दिसत आहे.

रबाळे एमआयडीसी परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्याचे काम काही घटक करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामागे राजकीय वरदहस्त व त्यांचे छुपे मनसुबे असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. रबाळे एमआयडीसीतच महापालिकेने एमआयडीसीच्या भूखंडावर विनापरवाना शाळा उभारल्याचा प्रकार लोकमतने उघडकीस आणला आहे. भूखंड हस्तांतर झालेला नसतानाही त्यावर शाळेची इमारत उभारण्याची घाई पालिका अधिकाऱ्यांनी केल्याने त्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. अशातच त्याच परिसरात स्मशानभूमी व दफनभूमीसाठी एमआयडीसीने महापालिकेकडे भूखंड हस्तांतरण करून देखील तो वापराविना पडून आहे. विशेष म्हणजे त्यावर स्मशानभूमी व दफनभूमी बांधण्याचे कंत्राट काढून ठेकेदाराला कार्यादेश देखील देण्यात आलेले आहेत. परंतु एक वर्षाहून अधिक कालावधीपासून प्रत्यक्षात त्याठिकाणी काम सुरु झालेले नाही. यामुळे सदर भूखंड कोणाच्या घशात घालण्याच्या छुप्या हालचाली सुरु आहेत का ? अशी शंका उपस्थित होत आहे.

रबाळे एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना एखाद्याचे निधन झाल्यास मृतदेह घेऊन रबाळे गावातील स्मशानभूमीत किंवा ऐरोलीच्या दफनभूमीत जावे लागत आहे. हे अंतर लांबचे असल्याने सर्वसामान्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वी असलेल्या स्मशानभूमीची जागा एमआयडिसीने विकल्याने त्यासाठी नवा २६ गुंठे भूखंड दिला आहे. त्यानुसार आर्किटेक्ट ने त्यावर स्मशानभूमी व दफनभूमीचा आराखडा तयार करून त्यास एमआयडीसीची मंजुरी देखील मिळवून दिली आहे. त्यानंतरही प्रत्यक्षात काम सुरु झाले नसल्याने भूखंड वापराविना पडून असून त्यावर झोपडपट्टीचे साम्राज्य उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

रबाळे एमआयडीसी परिसरात स्मशानभूमी, दफनभूमी नाही. पर्यायी नागरिकांना अंत्यविधीसाठी मृतदेह घेऊन रबाळे गाव व ऐरोली पर्यंत लांबचा प्रवास करावा लागत आहे. महापालिकेच्या ताब्यात भूखंड असतानाही त्यावर प्रत्यक्ष काम सुरु झालेले नाही. झोपडपट्टी पुनर्वसनावर डोळा असणाऱ्यांचा त्याला विरोध असून सदर भूखंड हडपला देखील जाऊ शकतो. - सुधाकर सोनवणे- माजी महापौर.