शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

लग्नकार्यालाही जुन्या नोटांचा फटका

By admin | Updated: November 12, 2016 06:42 IST

लग्न म्हटले की खर्च आलाच. मात्र सध्या लग्नसोहळ्यासाठी पैशांची जुळवाजुळव करतानाच वर-वधूच्या कुटुंबीयांच्या नाकीनऊ येत आहेत. ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद

वैभव गायकर, पनवेललग्न म्हटले की खर्च आलाच. मात्र सध्या लग्नसोहळ्यासाठी पैशांची जुळवाजुळव करतानाच वर-वधूच्या कुटुंबीयांच्या नाकीनऊ येत आहेत. ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर सर्वांचीच मोठी तारांबळ उडाली आहे. सुट्या पैशांचा तुटवडा त्यातच दुकानदारांनी जुन्या नोटा स्वीकारण्यास दिलेला नकार सर्वांचीच पंचाईत झाली आहे. लग्नाची तयारी सुरू असताना खरेदी करताना, अ‍ॅडव्हान्स देण्यासाठी सुटे पैसे जुळवताना त्यांच्या नाकीनऊ येत आहेत. खरेदीसाठी जमा केलेले लाखो रु पये पुन्हा बँकेत भरून त्या नोटा बदलण्याचे वाढीव काम या कुटुंबीयांना करावे लागत आहे. शिवाय पैसे काढण्यासाठी बँकांकडून २,००० ते ४,००० रुपयांची मर्यादा असल्याने पैशांचा तुटवडा जाणवत आहे. ५००, १००० रुपयांच्या नोटा बाद झाल्याने हॉल बुकिंगसाठी अ‍ॅडव्हान्स रक्कम जमा करताना अनेकांना अडचणी येत आहेत. तुळशी विवाहाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. त्यानंतर लगेचच लग्नसराईला सुरुवात होते. यंदा २१ नोव्हेंबर हा शुभ मुहूर्त आहे. त्यामुळे पनवेल, उरण, नवी मुंबई परिसरात ५० हून अधिक कार्य या मुहूर्तावर आयोजित करण्यात आले आहेत. आयुष्यातील सर्वात मोठा सोहळा म्हणून वधू-वरापासून त्यांचे कुटुंबीय रात्रंदिवस तयारी करीत असले तरी सध्या सर्वात मोठी समस्या ही सुट्या पैशांची आहे. अगदी लहानसहान वस्तूसह सोने खरेदीवरही परिणाम झाल्याचे लग्नकार्य असलेल्या कुटुुंबीयांचे म्हणणे आहे. काही सराफांकडून जुन्या नोटा स्वीकारण्यात येत असल्या तरी त्यावर काही नवीन दर आकारले जात आहेत. लग्नकार्य तोंडावर आल्याने आणि अन्य पर्याय नसल्याने काहींनी कुठेही वाच्यता न करता दागिने खरेदी केले आहेत. लग्नसराईसाठी खरेदी तर करायची आहे, त्यासाठी बँकेतून पैसेही काढले आहेत. मात्र आता जुन्या नोटा बँकेत भरण्यातच अधिक वेळ जात आहे, त्यामुळे खरेदी बाजूला ठेवून कुटुंबातील अनेकजण सकाळीउठून बँकांबाहेर रांगेत उभे असलेले दिसत आहेत. लग्नात कॅटरर्स, बँजो-बँडवाले, मंडप डेकोरेटर्स, फोटोग्राफर्स, आदींकडून जुन्या नोटा अ‍ॅडव्हान्स म्हणून स्वीकारण्यास नकार देण्यात येत आहे. त्यामुळे पैसे असूनही खर्च करता येत नसल्याची अवस्था अनेक कुटुंबांची झाली आहे. हौसेला घालावी लागते मुरड मध्यमवर्गीय असो वा श्रीमंत प्रत्येकजण लग्नकार्यात आपापल्या पध्दतीने आणि ऐपतीप्रमाणे खर्च करतात. मात्र ५००, १००० च्या नोटा चलनातून बाद झाल्याने नाइलाजास्तव बँकेत जमा कराव्या लागत आहेत. बँकेतील रांगेत तासन्तास जात असल्याने विविध वस्तूंची खरेदी रखडली आहे. त्यामुळे कुटुंबीयांना नातेवाईक, मित्रपरिवाराचा आधार घ्यावा लागत आहे. अनेक दिवसांपासून केलेल्या तयारीवर ऐनवेळी विरजण पडल्याने अनेक कुटुंबीयांना नाइलाजास्तव हौसेला मुरड घालावी लागत आहे.