शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पोलाद बाजार समितीला ५४ कोटींचा गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 20:09 IST

तीन वर्ष अधिकारी अंधारात : स्वतःला बँक अधिकारी भासवून मिळवले धनादेश

नवी मुंबई - सूर्यकांत वाघमारे लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : कळंबोली येथील पोलाद बाजार समितीची ५४ कोटी २८ लाखांची फसवणूक उघड झाली आहे. ठेवीची रक्कम समितीच्या बँक खात्यात जमा करण्याऐवजी वेगळ्या खात्यामध्ये जमा करून हि फसवणूक झाली आहे. विशेष म्हणजे मागील तीन वर्ष अज्ञात व्यक्ती स्वतःला बँक अधिकारी सांगून पोलाद बाजार समितीच्या कार्यालयातून धनादेश घेऊन जात असतानाही कोणालाही त्याबाबतची खात्री करावीशी वाटली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. 

मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समितीच्या उत्पन्नावरच अज्ञात व्यक्तीने डल्ला मारला आहे. या व्यक्तीने स्वतःला बँक अधिकारी भासवून तब्बल तीन वर्षात बाजार समितीचे ५४ कोटी २८ लाख हडपले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी निकम यांच्यामार्फत समितीच्या बँक खात्यांची व त्यामधील ठेवींची पडताळणी सुरु असताना हा प्रकार उघड झाला आहे. त्यानुसार निकम यांच्या तक्रारीवरून सुमन शर्मा नावाच्या व्यक्तीवर कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष दोन मार्फत अधिक तपास केला जात आहे. 

बाजार समितीचे युको बँकेत खाते असून सुमन शर्मा नावाची व्यक्ती २०२२ पासून स्वतःला बँकेचा शाखा अधिकारी सांगून समितीच्या कार्यालयात येऊन ठेवीचे धनादेश घेऊन जात होता. तर थेट बँकेचा अधिकारीच कार्यालयात येऊन धनादेश कसे घेऊन जात आहे ? असा उलटप्रश्न देखील कोणाला पडला नाही. त्याच्याकडून घेतलेल्या धनादेशाची बनावट पावती देखील दिली जात होती. या पावतीवर विश्वास ठेवीची रक्कम समितीच्याच खात्यात जमा होत असल्याचा समज अधिकाऱ्यांचा झाला होता. दरम्यान निकम यांना त्याच्यावर संशय आल्याने त्यांनी शर्माकडे बँकेतल्या आजवरच्या ठेवींबद्दल चौकशी देखील केली. मात्र त्याच्याकडून केवळ तोंडी माहिती दिली जात होती. तसेच ठेवी काढल्यास तुम्हाला दंड भरावा लागले असे सांगून त्यांचे ठेवींकडून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळे अधिकच संशय बळावला असता युको बँकेत चौकशी केली असता सुमन शर्मा नावाचे कोणीही नसल्याचे उघड झाले. तर २०२२ पासून त्याने नेलेले धनादेश तपासले असता तब्बल ५४ कोटी २८ लाखांच्या ठेवी बाजार समितीच्या खात्याऐवजी वेगळ्याच खात्यात जमा झाल्या असल्याचेही उघड झाले. त्यामुळे केलेल्या फसवणूक प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली असता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई