शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल महापालिकेसाठी अधिकाऱ्यांची फिल्डिंग

By admin | Updated: June 22, 2016 02:17 IST

पनवेल महानगरपालिकेसाठी अध्यादेश जारी करण्यात आला असून अखेरच्या दिवसापर्यंत ३९५७ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. याबाबत लवकरच सुनावणी अपेक्षित आहे

अरुणकुमार मेहत्रे,  कळंबोलीपनवेल महानगरपालिकेसाठी अध्यादेश जारी करण्यात आला असून अखेरच्या दिवसापर्यंत ३९५७ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. याबाबत लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. त्यामुळे लवकरच पनवेल महापालिका अस्तित्वात येणार असून त्यासाठी अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. पनवेल पालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असल्या तरी ते खुर्चीला चिकटून आहेत. सत्ताधाऱ्यांच्या शिफारशी घेवून याच ठिकाणी राहण्याकरिता त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. केडरवाले सुध्दा पनवेल महापालिकेत काम करण्यासाठी उत्सुक आहेत. ही महानगरपालिका ‘ड’ वर्गाची असल्याने जवळपास साडेबाराशेच्या वर मनुष्यबळ लागणार आहे. त्यामध्ये आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अभियंते, निरीक्षक, अधीक्षक, टंकलेखक, कारकुनांचा समावेश आहे. पनवेल नगरपालिकेत केडर त्याचबरोबर विना केडर अशा दोन प्रकारचे कर्मचारी आणि अधिकारी काम करतात. केडरवाल्यांची दुसरीकडे बदली होणे अपेक्षित असताना कित्येकजण अजूनही पनवेल पालिकेत काम करीत आहेत. पालिकेचे उपमुख्याधिकारी डॉ. भगवान खाडे यांची बदली दुसरीकडे झाली असताना ते पनवेलला राहण्यास इच्छुक आहेत. प्रशासकीय अधिकारी गणेश साळवे यांच्यासह इतर केडरवाले कित्येक वर्षांपासून एकाच जागेवर आहेत. पालिकेच्या अतिरिक्त मुख्याधिकारी चारुशीला पंडित यांची सुध्दा मागील आठवड्यात ठाणे महानगरपालिकेत बदली झाली आहे. परंतु ही बदली थांबविण्याकरिता प्रयत्न सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सुरेंद्र उईके नावाच्या अनुभवी अभियंत्याची बदली रत्नागिरी नगरपालिकेत करण्यात आली. या अधिकाऱ्यांना थांबविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर शिफारशी करण्यात येत आहेत.