शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बेशिस्त वर्तन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 02:14 IST

अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेशिस्त कामकाजामुळे पनवेल महापालिकेची प्रतिमा मलिन होऊ लागली आहे. कर्मचा-यांचे पार्टी प्रकरण ताजे असताना अजून एक अधिकाºयाच्या प्रतापाची छायाचित्रे समाज माध्यमांमधून व्हायरल होऊ लागली आहेत.

नवी मुंबई  - अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेशिस्त कामकाजामुळे पनवेल महापालिकेची प्रतिमा मलिन होऊ लागली आहे. कर्मचा-यांचे पार्टी प्रकरण ताजे असताना अजून एक अधिकाºयाच्या प्रतापाची छायाचित्रे समाज माध्यमांमधून व्हायरल होऊ लागली आहेत. या प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितावर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाºया पनवेल महापालिकेमधील कामकाजाला शिस्त लावण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. आयुक्त गणेश देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यापासून लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यामध्ये योग्य समन्वय साधला आहे. विकासकामांनाही गती देण्यास सुरवात केली आहे. परंतु काही अधिकारी व कर्मचाºयांच्या चुकीच्या वर्तनामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन होऊ लागली आहे. महापालिकेमध्ये कार्यरत असलेल्या एका अधिकाºयाची छायाचित्रे समाज माध्यमांमधून व्हायरल होऊ लागली आहेत. सुट्टीच्या दिवशी महापालिकेची गाडी घेऊन हे अधिकारी अवैध काम करण्यासाठी गेले होते. ते जिथे गेले होते तेथील नोंदवहीमधील त्यांच्या नावाचा उल्लेख असून त्याचीही छायाचित्रे काढून ती समाज माध्यमांवर टाकली जात आहेत. हा प्रकार खरा आहे की खोटा, सुट्टी दिवशी महापालिकेच्या वाहनाचा चुकीचा वापर केला आहे का? करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे का याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे. पालिकेमधील कंत्राटी कर्मचाºयांचे शोषण होत आहे का याचीही चौकशी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.पनवेल महापालिकेमधील पाणीपुरवठा कर्मचाºयाच्या सेवानिवृत्तीनिमित्त काही दिवसापूर्वी अधिकारी व कर्मचाºयांनी पार्टी केली होती. महापालिकेच्या हौदाजवळ मद्यपान करून धिंगाणा घातल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याविषयी प्रशासनावर चौफेर टीका करण्यात झाली होती. आयुक्तांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून पाच कर्मचारी व एका अधिकाºयाला निलंबित केले होते. यामुळे आता छायाचित्रे व्हायरल झालेल्या अधिकाºयाविषयी आयुक्त काय भूमिका घेणार याकडे पनवेलकरांचे लक्ष लागले आहे. याविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी आयुक्त गणेश देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता घडलेला प्रकार सुट्टीच्या दिवशीचा असून याविषयी सविस्तर माहिती घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Raigadरायगडpanvelपनवेल