शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर उभ्या वाहनांचा होतो अडथळा; नवीन पनवेल येथील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 00:21 IST

ना कारवाई ना दंड, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

कळंबोली : नवीन पनवेल रेल्वे स्थानकासमोर परिसरात मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी रस्त्यावर उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. दुहेरी पार्किंग केल्यामुळे रस्ता लहान झाला आहे. त्यामुळे वाहने ये- जा करण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे. बेशिस्त वाहतुकीला उधाण आले आहे. जागा मिळेल तिथे वाहने पार्क करण्यात येत आहेत. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाल्यामुळे वाहने पार्क करण्यात वाढ झाली आहे. नवीन पनवेल सेक्टर १५, १६ आणि १७ हा परिसर रेल्वे स्थानकामुळे गजबजलेला असतो. मोठ्या प्रमाणात वाहनांची या ठिकाणी वर्दळ असते. रेल्वे स्थानक परिसरातील पदपथ व्यवसाय धारकांनी गिळंकृत केला आहे.पदपथावर व्यवसाय थाटल्याने नागरिकांना चालण्यास पदपथ राहिले नाही. त्याचबरोबर रस्त्यावर दुहेरी बाजूस वाहने पार्किंग केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरातील सोसायटी धारक वाहतूक पोलिसांकडे वारंवार तक्रारी दाखल करतात. मात्र, पोलिसांकडून कारवाई मात्र शून्य होत असल्याने पार्किंगचे पेव वाढत चालले आहे. सकाळ आणि संध्याकाळी परिसरात चालणे मुश्कील होत आहे. सम- विषम पार्किंग फलक नावालाच उरले आहेत. रस्त्यावर वाहने आडवी तिडवी पार्क केल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. या पार्किंगमुळे होणारा त्रास दूर करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पार्किंगसाठी तोकडी व्यवस्थाया परिसरात पे ॲन्ड पार्किंगसाठी सिडकोकडून एकच प्लॉट देण्यात आला आहे. रेल्वे प्रशासन तसेच सिडकोकडून पार्किंग व्यवस्थेसाठी जागा उपलब्ध करणे अपेक्षित आहे; परंतु तोकडी व्यवस्था असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. रिक्षा स्टॅन्ड नसल्यामुळे रिक्षादेखील दुहेरी रस्त्यावर पार्क केल्या जात आहेत. नवीन पनवेल परिसरातील वीस फुटांचा असलेला रस्ता दिवसभर वाहने पार्किंग केल्यामुळे दहा फुटांचा होत आहे.