शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
2
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
3
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
4
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
5
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
6
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
7
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
8
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
9
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
11
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
12
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
13
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
14
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
15
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
16
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
17
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
18
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
19
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
20
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट

आता दिल्लीवारीचे वेध !

By admin | Updated: December 21, 2014 01:58 IST

प्रकल्पाच्या पाहणीसाठी उद्या २१ डिसेंबरला कल्याण डोंबिवली महापालिकेतील सर्वपक्षीय पदाधिकारी दिल्ली येथे मार्गस्थ होत आहेत.

कल्याण : मौजमजा आणि फोटो सेशनने केरळ दौरा चर्चेचा विषय ठरला असताना आता कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाच्या पाहणीसाठी उद्या २१ डिसेंबरला कल्याण डोंबिवली महापालिकेतील सर्वपक्षीय पदाधिकारी दिल्ली येथे मार्गस्थ होत आहेत. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या केरळ दौऱ्यावर तब्बल ३२ लाखांची उधळपट्टी झाली असताना दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर अंदाजे साडेपाच लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा केरळ दौरा मौजमजेच्या छायाचित्रांनी टीकेचे लक्ष ठरला होता. कचरा जाळून त्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प पाहण्यासाठी रविवारी पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी असे १६ जण दिल्लीला जाणार आहेत. यात महापौर कल्याणी पाटील, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, सभागृह नेते कैलास शिंदे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सर्वपक्षीय गटनेते आणि प्रभाग समिती अध्यक्ष आणि काही नगरसेवकांचा समावेश आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सुरेश पवार आणि सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांच्यासह अन्य दोघे जण देखील जाणार आहेत. दरम्यान, उपमहापौर राहुल दामले यांच्यासह भाजपाचे गटनेते श्रीकर चौधरी आणि राष्ट्रवादीचे गटनेते नीलेश शिंदे यांनी मात्र दौऱ्यावर जाण्यास नकार दिला आहे. विशेष बाब म्हणजे ज्या प्रभागात हा प्रकल्प राबविला जाणार आहे त्या उंबर्डे प्रभागाच्या नगरसेविका पुष्पा भोईर यांनी देखील दौऱ्यावर जाण्यास विरोध दर्शविला आहे. त्यामुळे या दिल्ली दौऱ्याचे फलित काय, असा सवाल उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी) २२ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०१४ या कालावधीतील केरळ दौऱ्यावर ३२ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी असे ५५ जण केरळला गेले होते. या दौऱ्याच्या विमान प्रवासावर १६ लाख १५ हजार ४२० रुपये खर्च झाला असून भोजन आणि इतर प्रवासावर १५ लाख ९१ हजार ८० रुपये खर्च झाले आहेत. या दौऱ्यात प्रत्येक व्यक्तीवर ५८ हजार ३०० रुपये इतका खर्च झाला आहे. या एकूण ३२ लाख ६ हजार ५०० रुपये खर्चाच्या प्रस्तावाला शनिवारच्या स्थायी समितीत मान्यता देण्यात आली. यावर कोणतीही चर्चा न करता काही सेकंदांतच हा प्रस्ताव सदस्यांकडून मान्य करण्यात आला.