शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी कार्यालय हटविण्याच्या नोटिसा

By admin | Updated: January 26, 2017 03:34 IST

पनवेल तहसीलदार कार्यालयात गेली कित्येक वर्षे ठाण मांडून बसलेल्या तलाठी व मंडळ अधिकारी यांना तहसीलमधून कार्यालये हलवण्याच्या

मयूर तांबडे / पनवेलपनवेल तहसीलदार कार्यालयात गेली कित्येक वर्षे ठाण मांडून बसलेल्या तलाठी व मंडळ अधिकारी यांना तहसीलमधून कार्यालये हलवण्याच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना आपला बोजा बिस्तरा गुंडाळावा लागणार आहे. पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांनी तशा नोटिसा तलाठी व मंडळ अधिकारी यांना दिल्या आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयात चिकटून बसलेल्या तलाठ्यांना आपापल्या सजामध्ये जावे लागणार आहे.पनवेल तालुका हा लोकसंख्येच्या तुलनेत मोठा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे नागरिकांची तलाठ्यांकडे नेहमीच कामे असतात. सातबारा तसेच त्याच्याशी निगडित अन्य कामे तलाठी तसेच मंडळ अधिकारी याच्यामार्फत होत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून तलाठी व मंडळ अधिकारी सजेच्या ठिकाणी न बसता तहसील कार्यालयात बसत आहेत. त्यामुळे आपल्या दूरच्या गावावरून नागरिकांना पनवेलला यावे लागत आहे. गावातील सजा सोडून पनवेलला यावे लागत असल्याने नागरिकांचा वेळ व पैसा दोन्ही खर्च होतात. पनवेलमध्ये सद्यस्थितीत ६९ ग्रामपंचायती असून १७७ गावे व वाड्या आहेत. तसेच ३५ तलाठी सजा व ५ मंडळ अधिकारी आहेत. पनवेलमधील ग्रामीण नागरिकांना सातबारा, फेरफार, अर्जाची चौकशी, उत्पन्नाच्या दाखल्याची चौकशी, जातीचे दाखले, नॉन क्रिमिलिअर दाखले, शेतकरी दाखले इत्यादि कामांसाठी आपल्या गावापासून पनवेलपर्यंतची दूरवरची पायपीट करावी लागत आहे. तसेच काही वेळेला तलाठी न भेटल्यामुळे पुन्हा फेऱ्या माराव्या लागतात. महसूल प्रशासन आणि जनतेचा दुवा म्हणून तलाठ्यांकडे पाहिले जाते. गावपातळीवर लोकांच्या अडीअडचणीत उपयोगी पडणारे अनेक गावचे तलाठी भाऊसाहेब तहसीलदार कार्यालयात बसूनच काम पाहत होते. त्यामुळे पनवेल तहसील कार्यालयातून तलाठी व मंडळ अधिकारी यांना पनवेल तहसीलमधून कार्यालये हलवून सजेच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यास सांगितले आहे. नागरिकांचे प्रश्न व अडीअडचणी लक्षात घेऊन तहसीलदारांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.पनवेलची व्याप्ती मोठी आहे. अनेक गावे पनवेल शहरापासून लांब आहेत. त्यातच तलाठी आपल्या सजेचे ठिकाण सोडून पनवेल तहसील कार्यालयात बसत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने निर्णय घेतला.