शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईकरांना करवाढ नाही, ५,७०९ कोटींचा अर्थसंकल्प सादर : पायाभूत सुविधांसह शिक्षण, आरोग्याला प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 09:11 IST

पायाभूत सुविधांसह पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण व्यवस्था बळकट करण्यावर अर्थसंकल्पात भर दिला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी २०२५-२६ वर्षासाठीचा ५,७०९ कोटी ९४ लाख  रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर केला.  विक्रमी सलग २१ वर्षे नवी मुंबईकरांवर कोणतीही करवाढ केलेली नाही. पायाभूत सुविधांसह पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण व्यवस्था बळकट करण्यावर अर्थसंकल्पात भर दिला आहे. 

नवी मुंबई पालिकेने २००५ पासून मंत्री गणेश नाईक यांच्या निर्देशानुसार करवाढ न करण्याचे धोरण निश्चित केले आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पातही थेट कोणताही कर वाढविलेला नाही. आयुक्त. डॉ. कैलास शिंदे यांनी पालिकेच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर केला. ‘मेरा शहर, मेरा अभिमान’ या घोषवाक्यासह ‘नई रफ्तार, नये अंदाज से चलता हैं’, ‘नई मुंबई का हर एक आदमी विकास की और चलता हैं’चा शायराना नारा देऊन आयुक्तांनी पुढील वर्षभरात कोणत्या योजनांना प्राधान्य देणार याची माहिती दिली. 

१,३०१ कोटी आरंभीच्या शिलकेमुळे यावर्षीचा अर्थसंकल्प ५,७०९ कोटी ९४ लाख रुपये झाला आहे. 

१,७५७कोटी रुपये सर्वाधिक उत्पन्न वस्तू व सेवा कर अनुदानाच्या माध्यमातून मिळणार  आहे. मालमत्ता कराच्या माध्यमातून १,२०० कोटींचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. शासन अनुदानातून ४०५ कोटी रुपये मनपाला मिळणार आहेत. 

नवी मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यासाठीच्या योजनांचा अर्थसंकल्पात समावेश केला आहे. पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, दळणवळणाच्या सुविधांना प्राधान्य दिले आहे. उत्पन्नाचे मार्ग वाढविण्याकडेही लक्ष दिले आहे.  डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, पालिका

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई