शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसई शाळा पडली ओस, तीन दिवस एकही विद्यार्थी शाळेत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 15:18 IST

एकाही वरिष्ठांकडून ना भेट, ना चौकशी; नवी मुंबई महापालिकेने नेमले मराठी शिक्षक

नवी मुंबई : शिक्षक द्या अशी मागणी करून नवी मुंबई महापालिकेच्या कोपखैरणे सीबीएसई शाळेतील पालकांनी गुरुवारी ठिय्या आंदोलन करून शिक्षक द्या, तरच मुलांना शाळेत पाठवू, अशी भूमिका घेतली होती. त्यानुसार गेले तीन दिवस एकाही पालकाने मुलाला शाळेत पाठवले नाही. त्यामुळे शाळा भरू शकली नाही. असे असतानाही शिक्षण मंडळातील एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने ना शाळेला भेट दिली ना चौकशी केली. त्यामुळे पालक संतापले आहेत.

महापालिकेला जर सीबीएसई शाळा चालवण्याची ऐपत नव्हती तर आमच्या मुलांच्या भवितव्याशी का खेळत आहात असा सवाल त्यांनी केला आहे. आमच्या मुलांना इतर शाळांत प्रवेश घेऊन द्या नाहीतर ही महापालिकेची शाळा खासगी संस्थेला चालवायला द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुख्यालयात शाळा भरवण्यावर पालक ठामपालकांनी सोमवारी पालिका मुख्यालयात शाळा भरविण्याचा निर्णय घेतला असून त्यावर ते ठाम आहेत. शनिवारपासून पाऊस सुरू झाला आहे. मोठ्या पावसाची शक्यता आहे. असे असताना पालक मुलांच्या भवितव्यासाठी मागे हटायला तयार नाहीत. पावसात आमच्या मुलांना जर काही झाले तर त्याची जबाबदारी महापालिकेची असेल असेही पालकांनी सांगितले.

ते शिक्षक म्हणतात, आम्हाला अभ्यास करावा लागेलमहापालिकेने बुधवारी सहा शिक्षकांची तात्पुरती ऑर्डर काढली. यातील पाच शिक्षक हजर झाले आहेत, पण ते सर्व मराठी माध्यमाचे आहेत. त्यांच्याशी संपर्क केला असता, आदेश असल्यामुळे हजर होणे क्रमप्राप्त होते. आम्हाला सीबीएसई अभ्यासक्रमाचा अभ्यास करावा लागेल. नंतर मुलांना शिकवू. यावरून शाळांची किती गंभीर परिस्थिती आहे हे लक्षात येते.

आंदोलनाचा श्री गणेशा होणार की?आमदार गणेश नाईक यांच्याबरोबर रविवारी दुपारी काही पालक प्रतिनिधींची बैठक आयोजित केली आहे. ते काय भूमिका घेतात, त्याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. काही पालकांनी या बैठकीनंतर सोमवारच्या आंदोलनाचा श्री गणेशा होणार की नाही? याबाबत शंका उपस्थित केली आहे.

नेमकी शिक्षक भरती रखडली का?महापालिकेचा सर्वच शाळेत शिक्षक कमी आहेत. गेली दीड दोन वर्षे पालिका प्रशासन शिक्षक भरतीसाठी अनेकदा निविदा प्रक्रिया राबवली आहे. मात्र, प्रतिसाद मिळत नाही असे सांगितले जात आहे. परंतु, ही शिक्षक भरती नेमकी रखडली कशांमुळे याबाबत आता शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई