शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभर पाठपुरावा करूनही अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई नाही; नामदेव भगत यांचा प्रशासनावर आरोप

By नामदेव मोरे | Updated: May 15, 2024 18:17 IST

नवी मुंबई : अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी एक वर्षापासून नवी मुंबई महानगरपालिकेकडे करत आहे. पत्रव्यवहारही केला; ...

नवी मुंबई : अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी एक वर्षापासून नवी मुंबई महानगरपालिकेकडे करत आहे. पत्रव्यवहारही केला; परंतु प्रशासनाने कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे अनधिकृत होर्डिंग्जला पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत यांनी बुधवारी केली.        मुंबईमधील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भगत यांनी पत्रकार परिषद आयोजित केली हाेती. गतवर्षी मुंबई-बंगळुरू महामार्गावर पुणे येथे होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेपासून नवी मुंबई महानगरपालिकेकडे अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईसाठी पत्रव्यवहार करत आहे. तत्कालीन आयुक्तांनी पत्रावर कारवाईचा शेराही मारला होता. परंतु, वर्षभरात प्रशासनाने प्रत्यक्षात काहीही कारवाई केलेली नाही. नवी मुंबई परिसरामध्ये अनेक अनधिकृत होर्डिंग आहेत. नियमांची पायमल्ली करून सिग्नलवर व इतर ठिकाणी ती उभी केली आहेत. यामुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता आहे.      तक्रारी करूनही होर्डिंग्जविरोधात वर्षभरात ठोस कारवाई केली नाही. आता तत्काळ कारवाई सुरू केली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही नामदेव भगत यांनी दिला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका