शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

एनएमएमटीच्या ३० नवीन बसेस, बसेसची संख्या ४८२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 02:38 IST

महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात ३० नवीन मिडी बसेस दाखल झाल्या आहेत.

नवी मुंबई : महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात ३० नवीन मिडी बसेस दाखल झाल्या आहेत. यामुळे बसेसची संख्या ४८२ एवढी झाली आहे. शहरवासीयांना चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपक्रमाने नवीन बसेस घेतल्या आहेत.कोपरखैरणे डेपोमध्ये महापौर जयवंत सुतार यांच्या उपस्थितीमध्ये बसेसचे लोकार्पण करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्र माच्या ८२ व्होल्व्हो बसेससह एकूण ४५२ बसेसच्या ताफ्यामध्ये ३0 नवीन मिडी बसेसची भर पडली असून आयशर व्होल्व्हो प्रकारच्या या बसेस सेमी अ‍ॅटोमॅटिक स्वरूपाच्या आहेत. यामध्ये अ‍ॅटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन पद्धतीचा वापर करण्यात आला असून क्लचविरहित व गिअरचा कमीत कमी वापर करावा लागत असल्याने चालकांसाठी या बस अत्यंत आरामदायी आहेत. शहरात ७0 विविध मार्गांवरून एन.एम.एम.टी. बससेवा पुरविली जात असून त्यामधील मार्ग क्र मांक ८, २१, २२ अशा छोट्या रस्त्यांवरून मार्गक्रमण करणाऱ्या एन.एम.एम.टी. बसेसच्या विविध मार्गांवर या मिडी बसेस लाभदायी ठरणार आहेत.या मिडी बसेसमुळे एन.एम.एम.टी. सेवा अधिक सुलभ व सुनियोजित पद्धतीने पुरविणे शक्य होणार असून याद्वारे नागरिकांकरिता अधिक चांगली बससेवा उपलब्ध होणार आहे.याप्रसंगी ऐरोलीचे आमदार संदीप नाईक, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्थायी समितीचे सभापती तथा परिवहन समितीचे पदसिद्ध सदस्य सुरेश कुलकर्णी, कार्यक्र माचे निमंत्रक तथा परिवहन समितीचे सभापती रामचंद्र तथा आबा दळवी, इ प्रभाग समिती अध्यक्ष लता मढवी, नगरसेवक निवृत्ती जगताप, परिवहन समिती सदस्य प्रदीप गवस, राजू शिंदे, अब्दुल जब्बार खान, काशिनाथ पाटील, राजेंद्र इंगळे, वीरेश सिंग, सुधीर पवार, राजेंद्र आव्हाड, समीर बागवान तसेच महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, परिवहन उपक्र माचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड व मुख्य लेखा व वित्त अधिकारी नीलेश नलावडे उपस्थित होते.