शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

निवारा ट्रस्टचा नवी मुंबईकरांनाही दणका; लखपती होण्याचा मोह पडला महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 09:28 IST

नवी मुंबईतील एपीएमसी आवारात हा प्रकार घडला आहे. निवारा ट्रस्टच्या नावाखाली काहीजण एपीएमसी आवारात फिरत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : निवारा ट्रस्टमध्ये गुंतवणूक करून १८ महिन्यांत लाखो रुपये कमवण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या ट्रस्टवर यापूर्वी कोल्हापुरातही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

नवी मुंबईतील एपीएमसी आवारात हा प्रकार घडला आहे. निवारा ट्रस्टच्या नावाखाली काहीजण एपीएमसी आवारात फिरत होते. त्यांनी ट्रस्टमध्ये ६ हजार रुपयांची गुंतवणूक करून १८ महिन्यांत २९ लाख ६६ हजार रुपये मिळतील, असे अनेकांना सांगितले. त्यासाठी निवारा ट्रस्टचे पुण्यात मोठे प्रस्थ असून देश, विदेशातून निधी मिळत असतो. त्यातून सामाजिक कार्य केले जाते असे नागरिकांना सांगण्यात येत होते. 

अनेक महिन्यांपासून या व्यक्ती नागरिकांना विश्वासात घेऊन गुंतवणूक करून घेत होत्या. प्रत्यक्षात मात्र ही ट्रस्ट बनावट असून त्यांच्यावर कोल्हापूरमध्ये यापूर्वी फसवणुकीचे गुन्हेही दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. एपीएमसी आवारात त्यांनी पंडित गाडगे, कल्पना गवंडे, सुखदेव डोके, विलास डोके, शिवाजी गुरव, आनंदराव डाकवाले, विक्रांत डोके व चंद्रकांत डोके यांच्यासह इतर अनेकांकडून ६ हजार ते त्याहून अधिक रक्कम गुंतवणूक करून घेतली होती. त्यापैकी काहींचे नुकतेच १८ महिने पूर्ण झाल्याने ते नफ्याची रक्कम मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

मुंबईतही अनेकांची झाली फसवणूक याप्रकरणी त्यांनी एपीएमसी पोलिसांकडे तक्रार केली असता काशिनाथ जाधव, रमेश घाटगे, संतोष तोडकर, दीपाली पतंगे व पूजा भोसले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी मागील काही दिवसात नवी मुंबईसह मुंबईतदेखील अनेकांना गंडा घातल्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.