शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नेरुळमध्ये रंगला सखी सन्मान सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 23:08 IST

विविध क्षेत्रातील महिलांच्या सन्मानासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल परिसरातून शेकडोच्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

विविध क्षेत्रात कार्यरत महिलांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ‘लोकमत’चा नेहमीच सकारात्मक प्रयत्न राहिला आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी नेरुळ येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नवी मुंबईसह मुंबई आणि ठाणे येथील आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक, उद्योग तसेच कलाक्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा ‘लोकमत’ सखी सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला महिलांनी मोठी गर्दी केली होती. भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज, सिनेअभिनेत्री धनश्री काडगावकर तसेच अभिनेत्री अदिती गोवित्रीकर हे या कार्यक्रमांचे विशेष आकर्षण ठरल्या, तसेच कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या बहारदार नृत्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

महिलांच्या सन्मानासाठी पुरुषही सरसावलेविविध क्षेत्रातील महिलांच्या सन्मानासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल परिसरातून शेकडोच्या संख्येने महिला उपस्थित होत्या. तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरुषांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

प्रमुख पाहुण्यांची उपस्थितीया पुरस्कार सोहळ्यास विकासक प्रकाश बाविस्कर, शशी यादव, अमरदीप सिंग, किरण राजपूत, जाफर पिरजादा, प्रीती सिंग, शिवानी नेमवरकर, दीपक शेट्टी, मंगेश परुळेकर, डॉ. राजेश मढवी आदी उपस्थित होते.

विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांच्या सत्काराचे महत्त्वपूर्ण कार्य ‘सखी सन्मान’ सोहळ्याच्या माध्यमातून झाले. विजय नाहटा फाउंडेशनतर्फे महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये आरोग्य तपासणीसह आत्मसंरक्षणाचे धडेही दिले जातात. आजवर विविध क्षेत्रात ज्या महिलांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे, त्यांनीही या देशाच नाव जगभरात उंचीवर नेवून ठेवले आहे, यामुळे अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांचा सन्मान झालाच पाहिजे. - विजय नाहटा, शिवसेना उपनेते तथा अध्यक्ष, विजय नाहटा फाउंडेशन

 

टॅग्स :Lokmatलोकमत