शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

बालाजी मंदिर सीआरझेड मंजुरीप्रकरणी एनजीटीची केंद्रीय वने-पर्यावरण मंत्रालयाला नोटीस

By नारायण जाधव | Updated: April 30, 2024 17:34 IST

पर्यावरणवाद्यांचा अर्ज स्वीकारल्याने मंदिराच्या अडचणी वाढल्या

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : एनजीटी अर्थात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने नवी मुंबईतील उलवेतील तिरुपती व्यंकटेश्वर स्वामी मंदिरासाठी दिलेल्या सीआरझेड मंजुरीला आव्हान देणारा शहरस्थित पर्यावरणवाद्यांचा अर्ज अखेर स्वीकारला आहे. एनजीटीच्या पश्चिम विभागीय खंडपीठाचे न्यायिक सदस्य म्हणून न्यायमूर्ती दिनेश कुमार आणि तज्ज्ञ सदस्य म्हणून डॉ. विजय कुलकर्णी यांनी याप्रकरणी आता केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाला चार आठवड्यांत उत्तर देण्यासाठी नोटीस बजावली आहे.

एनजीटीत नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी असा युक्तिवाद केला की, १० एकर भूखंडांचे वाटप आणि सीआरझेड प्राधिकरणाने दिलेली मंजुरी बेकायदेशीर आहे. कारण जमीन मंदिराचा भूखंड सीआरझेड-१ मध्ये मोडतो. तरीही महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीने चुकीच्या पद्धतीने सीआरझेड मंजुरी दिली आहे. वास्तविक त्यासाठी केंद्रे वने आणि पर्यावरण मंत्रालयाकडे अर्ज करणे आवश्यक होते.

महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीने भूखंडाच्या सीआरझेड नसलेल्या भागात बांधकामाला परवानगी दिली असली तरी  सीआरझेड-१ क्षेत्राच्या ५० मीटर खारफुटीच्या बफर झोनमध्येही कंपाउंड वॉल आणि लॉनला परवानगी दिल्याने नॅटकनेक्टने त्याला विरोध केला आहे. यावर कुमार यांच्या वकील रोनिता भट्टाचार्य यांच्या युक्तिवादाची दखल घेऊन एनजीटी खंडपीठाने अर्ज स्वीकारून पुढील सुनावणी ३० ऑगस्ट रोजी ठेवली आहे.

यावेळी एनजीटी खंडपीठाने भट्टाचार्य यांना एमसीझेडएमए प्रतिज्ञापत्राला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला, तर तिरुमाला तिरुपती देवस्थानचे वकील सत्य सभरवाल यांना या खटल्यात त्यांचा जबाब नोंदविण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्यावर्षी जूनमध्ये या मंदिराचे भूमिपूजन केले होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई