शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

नेरुळमधून जलवाहतुकीला नवीन वर्षाचा मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 02:38 IST

Navi Mumbai : रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्याबरोबरच पर्यावरणपूरक वाहतूक यंत्रणा निर्माण करण्याच्या सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या आहेत.

नवी मुंबई : मागील अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला नवी मुंबई ते मुंबईदरम्यानचा सागरी प्रवास आता दृष्टिपथात आला आहे. नेरुळ येथे जेट्टी उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष जलवाहतूक सुरू करण्यासाठी सिडकोने मे, २0२१चा मुहूर्त निश्चित केला आहे. त्या दृष्टीने संबंधित विभागाकडून चाचपणी सुरू आहे.रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्याबरोबरच पर्यावरणपूरक वाहतूक यंत्रणा निर्माण करण्याच्या सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या आहेत. त्यानुसार, मुंबई पोर्ट ट्रस्ट, जेएनपीटी आणि मेरिटाइम बोर्ड यांच्या संयुक्त सहकार्यातून सिडकोने नवी मुंबई ते मुंबईदरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात नेरुळ येथे जेट्टी उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. एप्रिल, २0१८ मध्ये या जेट्टीच्या उभारणीला मंजुरी मिळाली होती. त्यासाठी सुमारे १११ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे काम दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु कोरोनाचा संसर्ग आणि इतर तांत्रिक अडचणीमुळे हे काम काही प्रमाणात रखडले होते. असे असले, तरी मागील काही महिन्यांपासून जेट्टीच्या कामाने वेग घेतला आहे. गेल्या महिन्यात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांनी या प्रकल्पाला भेट देऊन कामाची पाहणी केली होती. त्यानुसार, पुढील पाच-सहा महिन्यांत जेट्टीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. पुढील चार-पाच महिन्यांत नेरुळ जेटीचे काम पूर्ण होईल. त्यानंतर, या जेट्टीचे मेरिटाइम बोर्डाकडे हस्तांतरण करण्यात येईल. एकूणच मे, २0२१ मध्ये नवी मुंबई ते मुंबईदरम्यान सागरी मार्गाचा प्रवासी वाहतुकीचा पहिला  टप्पा सुरू करण्याची सिडकोची योजना आहे. वाहतूककोंडी कमी करण्याच्या दृष्टीने जलवाहतुकीचा पर्याय सर्वोत्तम मानला जात आहे. त्यानुसार, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अलिबाग आणि मांडवा ही शहरे जलमार्गाने जोडण्याची सरकारची योजना आहे.  

पहिल्या टप्प्यातील काम या जलवाहतूक प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात नेरुळ जेट्टीचा विकास केला जात आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या विकासाचे काम हाती घेतले जाणार आहे. या टप्प्यात वाशी आणि बेलापूर येथील जेट्टी प्रस्तावित आहेत. या तिन्ही जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईसह अलिबागसुद्धा नवी मुंबईला जलमार्गाद्वारे जोडण्याची योजना आहे. 

सरकारची योजनामुंबई, ठाणे, नवी मुंबई, अलिबाग  आणि मांडवा ही शहरे जलमार्गाने जोडण्याची सरकारची योजना आहे. हे जलमार्ग सुरू झाल्यानंतर रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे, तसेच प्रवासी वाहतुकीच्या  कंटाळवाणा प्रवासाचा  कालावधीसुद्धा काही तासांनी कमी होणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई