शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागमध्ये नववर्ष स्वागत यात्रा

By admin | Updated: April 9, 2016 02:23 IST

गुढीपाडव्या निमीत्त अलिबाग शहरात आयोजित मराठी नववर्ष स्वागत यात्रेत तरुणाई आणि महिलांचा प्रचंड उत्साह पाहाण्यास मिळाला

अलिबाग : गुढीपाडव्या निमीत्त अलिबाग शहरात आयोजित मराठी नववर्ष स्वागत यात्रेत तरुणाई आणि महिलांचा प्रचंड उत्साह पाहाण्यास मिळाला. मराठमोळ््या पेहेरावातील अबाल-वृद्ध आणि त्याचबरोबर महिलांचे ढोल पथक सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. सकाळी शहरातील ब्राम्हण आळीमधील श्रीराम मंदिराच्या प्रांगणात अलिबाग मधील व्ज्येष्ठ वकिल अ‍ॅड.एन.के.जोशी आणि ज्येष्ठ नागरिक पंढरीनाथ पाटील यांनी सपत्नीक गुढीची विधवत पूजा केल्यावर या नववर्ष स्वागत यात्रेस उत्साहात प्रारंभ झाला. सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे घोड्यावरुन या शोभायात्रेत सहभागी झाले होते.शहरातील विविध गणेश मंडळे, नवरात्र मंडळे, विविध संस्था, ज्ञाती मंडळे आणि विविध युवा मंडळे या सह सर्वपक्षीय राजकीय व्यक्तीमत्वे या स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. राममंदिर, महाविरचौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूतळा, चेंढरे मारुती मंदिर, शेतकरी भवन, ठिकरुळ नाका, शिवलकर नाका, बाजारपेठ मार्गे ही नववर्ष स्वागत यात्रा सरखेल कान्होजी आंग्रे स्मारक येथे आल्यावर सांगता झाली. यंदाचे वर्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे वर्ष असल्याने, त्याचे औचित्य साधून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जिवनावर आधारीत चित्ररथ हे यंदाचे एक वैशिष्ट्य होते. प्रतिवर्षी या स्वात यात्रेत नागरिकांचा सहभाग वाढत असल्याचे नववर्ष स्वागत यांत्रेचे निमंत्रक डॉ. प्रा. उदय जोशी यांनी सांगितले. खगोलशास्त्र, कर्तृत्ववान महिला या विषयावरील आगळे चित्र तर ऐतिहासिक पेहेरावातील घोडेस्वार, घोडागाड्या, मल्लखाब पथके, आणि तालुक्यांतील विविध बॅन्ड पथके यांचा सहभाग हे या नववर्ष यात्रेचे एक वैशिष्ट्य होते. (विशेष प्रतिनिधी)> महाडमध्ये शोभायात्रामहाड : नवीन मराठी वर्षाच्या स्वागतानिमित्त महाडमध्ये शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले होते. या शोभायात्रेमध्ये ढोल ताशाच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत पुरुषांसह महिलाही मोठ्या उत्साहाने सहभाग झाल्या होत्या. शहरातील विविध ढोल पथके सामील झाली होती.रोहा अष्टमी नगर परिषदेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवा निमित्त गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. सी. डी देशमुख शहर सभागृह येथून प्रारंभ झालली ही शोभा यात्रा शहरात सर्वत्र फिरली. नगराध्यक्ष समीर शेडगे यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठया संख्येने रोहेकर यात्रेत सहभागी झाले होते. शोभा यात्रेचे नियोजन सुखद राणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. सायंकळी प्रफुल्लित वातावरणात ठिकठिकाणी काढलेल्या आकर्षक रांगोळ््या, नेत्रदीपक वेशभूषा, विविध चित्ररथ हे या यात्रेचे आकर्षण ठरले.नेरळ : तरु णाईचा जल्लोष, ढोलताशांच्या गजरात संपूर्ण नेरळ आणि परिसरात उत्साहात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. पारंपरिकतेचे सत्व जपत नेरळमध्ये नववर्ष शोभायात्रेचे आयोजन केले होते. नेरळमधील नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेस चिंचआळी येथील दत्त मंदिर येथून प्रारंभ झाला.