शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

भाजी मार्केटसाठी आता नवीन नियमावली!; बाजार समितीमध्ये सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 07:19 IST

बाजार समितीमध्ये सर्वाधिक गर्दी भाजीपाला मार्केटमध्ये होत असते. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता असल्यामुळे व्यापारी महासंघ व बाजार समिती प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे.

नवी मुंबई : मुंबई, नवी मुंबईकरांना जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा करता यावा, यासाठी बाजार समितीमधील पाचही मार्केट सुरूच राहणार आहेत. भाजी मार्केटमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी मार्केटची वेळ रात्री २ ते सकाळी १० ऐवजी रात्री १० ते सकाळी १० अशी करण्यात आली आहे. मार्केटमधील किरकोळ व्यापार बंद करण्यात आला असून, मोटारसायकल व कारना मार्केटमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे.बाजार समितीमध्ये सर्वाधिक गर्दी भाजीपाला मार्केटमध्ये होत असते. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता असल्यामुळे व्यापारी महासंघ व बाजार समिती प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. मार्केटमध्ये किरकोळ विक्री पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ग्राहकांना पालेभाज्यांची किमान एक गोण खरेदी करावी लागणार आहे. फळभाज्या किमान १० किलोपेक्षा जास्त खरेदी कराव्या लागणार आहेत. मार्केटमध्ये सायंकाळी सहा ते पहाटे पाचपर्यंत कृषी मालाची आवक सुरू राहणार आहे. रात्री १० ते सकाळी दहापर्यंत व्यापार करता येणार आहे. मार्केटमध्ये आलेली वाहने तीन तासात बाहेर गेली पाहिजेत. मोटारसायकल, कार या खासगी वाहनांना मार्केटमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. अडते, व्यापारी यांनी त्यांच्या गाळ्यामध्ये सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक आहे.मार्केटमधील किरकोळ व्यापार बंद करण्यात आला असून, मोटारसायकल व कारना मार्केटमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे. बाजार समितीमध्ये ४५ वर्षांवरील सर्वांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १ हजार रूपये दंड आकारण्यात येणार आहे.  मार्केटमध्ये एकावेळी २००पेक्षा जास्त ग्राहकांना सोडले जाणार नाही. मार्केटमध्ये चार गेटच सुरू ठेवले जाणार असून, इतर बंद केली जाणार आहेत. मार्केटमध्ये प्रत्येक गाळ्यात व्यापारी व एक मदतनीस यांनाच थांबता येणार आहे. रोजंदारीवर काम करणारांचीही अँटिजेन चाचणी करण्यास सुरुवात केली आहे.बाजार समितीमध्ये आवक वाढलीलॉकडाऊनच्या शक्यतेमुळे भाजीपाला मार्केटमध्ये शनिवारी तब्बल ६९१ वाहनांची आवक झाली होती. सोमवारीही ६६१ वाहनांची आवक झाली आहे. आवक वाढल्यामुळे भाजीपाल्याचे दर १५ टक्केे कमी झाले आहेत. मंगळवारपासून नियंत्रित आवक सुरू राहील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार सुरळीत सुरू राहील. याकडे लक्ष देण्यात आले आहे. प्रत्येक मार्केटमध्ये सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असून, भाजी मार्केटसाठी विशेष नियमावली लागू केली आहे.     - संदीप देशमुख, प्रभारी सचिव, एपीएमसीभाजी मार्केटसाठी नवीन नियमावली तयार केली असून, त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत असून, मुंबई, नवी मुंबईकरांना जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा करण्यात येणार आहे.     - शंकर पिंगळे, संचालक, भाजी मार्केट

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती