शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

होल्डिंग पाँडवर नवे सुरक्षारक्षक

By admin | Updated: July 5, 2017 06:43 IST

कळंबोली वसाहतीत पावसाळ्यात होल्डिंग पाँडवर गेल्या दहा वर्षांपासून २४ तास काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांना यंदा काम देण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : कळंबोली वसाहतीत पावसाळ्यात होल्डिंग पाँडवर गेल्या दहा वर्षांपासून २४ तास काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांना यंदा काम देण्यात आले नाही. संबंधित एजन्सीने या ठिकाणी नवीन सुरक्षारक्षक नेमले आहेत. केवळ एका नगरसेवकाच्या दबावापोटी हा बदल केला असल्याचा आरोप अनुभवी सुरक्षारक्षकांनी केला आहे. आम्ही सर्व जण स्थानिक आहोत आणि आपल्यावरील अन्यायावरील तक्रार त्यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांकडे केली.कळंबोली वसाहत समुद्रसपाटीपासून तीन मीटर खाली आहे. त्यामुळे सलग पाऊस पडला तर वसाहतीत पाणी भरते. २००५मध्ये २६ जुलै रोजी सर्वाधिक मनुष्य आणि वित्तहानी कळंबोलीत झाली होती. सिडकोने पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च करून चॅनेल काढले. त्याचबरोबर पाच ठिकाणी जलधारण तलाव म्हणजे होल्डिंग पाँड विकसित केले. पाँडला पावसाळी नाले जोडण्यात आले आहेत. पंपाद्वारे पाँडमधील पाणी उपासण्याची सुविधा आहे. एकंदर होल्डिंग पाँड हे कळंबोलीचे रक्षक आहेत. या ठिकाणी सिडकोकडून सुरुवातीला ५४ सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात आले होते. आता पाचही होल्डिंग पाँडच्या सुरक्षेची जबाबदारी २७ जणांवर आहे. चेंबरची तपासणी करणे, वेळप्रसंगी गेट उघडणे, बंद करणे, सिडकोच्या आपत्कालीन कक्षाला माहिती पुरविणे, अशी कामे सुरक्षारक्षक करतात. गेल्या दशकभरापासून काम करीत असल्याने त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. असे असताना हे काम मिळालेल्या एजन्सीने या जुन्या सुरक्षारक्षकांऐवजी नवीन सुरक्षारक्षक नियुक्त केले आहेत. वर्क आॅर्डरवर मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांची सही झालेली नाही, तरी नवीन सुरक्षारक्षकांना कामावर घेण्यात आले आहे. यंदा आम्हाला काम देण्यात आले नसल्याचे विलास पाटील या सुरक्षारक्षकाने सांगितले. मंगळवारी दुपारी रमेश बगाडे, विजय कुस्ते यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षारक्षकांनी सिडकोचे कार्यकारी अभियंता सुनील कापसे यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. एजन्सी आणि सुरक्षारक्षक नियुक्त करणे हे काम सुरक्षा विभाग करीत असल्याचे या वेळी कापसे यांनी सांगितले.गावातील तरुण गेल्या अनेक वर्षांपासून हे काम करीत आहेत. त्यांना याबाबत इत्थंभूत माहिती आहे. वसाहतीत पुराची परिस्थिती निर्माण होऊ नये, याकरिता ते सतत अलर्ट असतात. आता नवीन सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात आलेत, त्यांना याबाबत काहीच माहिती नाही. एका नगरसेवकाच्या सांगण्यानुसार हे बदल करण्यात आल्याचे बोलले जात आहे. - विजय कुस्ते, स्थानिक प्रकल्पग्रस्त, कळंबोली.