शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

विमानतळबाधितांसाठी नवे पर्याय

By admin | Updated: August 26, 2015 22:56 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांना पुष्पकनगर येथे भूखंडांचे वाटप करण्यात येत आहे. प्रकल्पग्रस्तांनी प्राप्त झालेल्या या भूखंडांची विक्री न करता त्याचा स्वत:च विकास

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांना पुष्पकनगर येथे भूखंडांचे वाटप करण्यात येत आहे. प्रकल्पग्रस्तांनी प्राप्त झालेल्या या भूखंडांची विक्री न करता त्याचा स्वत:च विकास करावा, अशी सिडकोची भूमिका आहे. त्यासाठी गुंतवणुकीचे कोणकोणते पर्याय आहेत, याची माहिती प्रकल्पग्रस्तांना मिळावी, या दृष्टीने सिडकोने नामवंत बँकांच्या समन्वयाने एका विशेष मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन केले आहे. २८ आॅगस्ट रोजी वाशी येथील सिडकोच्या प्रदर्शन केंद्रात सकाळी १०.३० ते संध्याकाळी ४.३० या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. राज्य सरकारने विमानतळ प्रकल्पबाधितांसाठी जाहीर केलेल्या २२.५ विकसित भूखंडाचे धोरण आणि पुनर्वसन व पुन:स्थापन पॅकेजनुसार सिडकोतर्फे प्रकल्पबाधितांना भूखंडाचे वाटप करण्यात येत आहे. अशा भूखंडावर निवासी व व्यावसायिक संकुले विकसित करण्यासाठी विविध विकासक आकर्षित होत आहेत. परंतु यापूर्वी १२.५ टक्के योजनेंतर्गत वाटप करण्यात आलेल्या भूखंडाबाबत ज्या घटना घडल्या त्यांची पुनरावृत्ती होवू नये, विमानतळबाधितांनी स्वत:च विकासक बनून आपल्या भूखंडाचा विकास करावा, त्या दृष्टीने सिडको प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत सिडकोतर्फे पुनर्वसन व पुन:स्थापन, नियोजन, बांधकाम परवानगी आणि वसाहत विभागातर्फे भूखंड विकासासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या व मान्यता कशाप्रकारे मिळवाव्यात याविषयी विस्तृत माहिती देणारे सादरीकरण करण्यात येणार आहे. तसेच बँक आॅफ महाराष्ट्रतर्फे मोठे कर्ज प्रस्ताव, अ‍ॅक्सिस बँकतर्फे गृहकर्ज व कॅनरा बँकेतर्फे गुंतवणूक प्रतिनिधींकडून उपस्थितांचे शंका निरसन करण्यासाठी प्रश्नोत्तरे सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)