नवी मुंबई : सध्या सुरू असलेल्या इमारतीचे बांधकाम पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करावे, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे. खोदकामाच्या खड्ड्यांमध्ये पाणी साठणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी आणि पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. अर्धवट स्थितीतील खोदकाम केलेले असल्यास त्याला संरक्षक भिंत घालण्यात यावी जेणेकरून लहान मुले, पशू याठिकाणी जाणार नाहीत व प्राणहानी टळेल याचीही दक्षता घेतली जावी. नियोजित इमारतीच्या पायाचे अथवा तळघराचे बांधकाम करत असतांना लगतच्या भूखंडाच्या कुंपणभिंतीचे किंवा लगतच्या इमारतीचे बांधकाम खचणार नाही याची दक्षता घेण्याचेही सुचित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
नवीन बांधकामांना मे पर्यंतची मुदत
By admin | Updated: May 1, 2016 02:40 IST