शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

ना अपघाताची भीती ना दंडाची; दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलणारे वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 23:34 IST

पनवेल, कळंबोलीतील १२४१ जणांवर कारवाई ; जरब निर्माण करण्यात अपयश

मयूर तांबडेनवीन पनवेल: दुचाकी, चार चाकी वाहन चालवताना मोबाइलवर बोलणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आपल्या जीवापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. त्यामुळे वाहन चालविताना मोबाइलवर बोलू नये आणि जर अति आवश्यक फोन असेल तर वाहन थांबवून बोलावे. पण तरीही  मोबाइलवर बोलणाऱ्यांचे प्रमाण कमी होताना दिसून येत नाही.

विशेष म्हणजे शासकीय बस, शासकीय वाहने यांच्यावरील चालकही गाडी चालविताना मोबाइलवर बोलत असताना दिसतात. पोलीसही यात मागे नाहीत. वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या चालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. उजव्या हातात गाडीचे हॅण्डल आणि डाव्या हातात मोबाइल पकडून गाडी चालवत बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. तर काही गाडी चालवित असताना  संदेश वाचत असतात.  

मोबाइलवर बोलणे आणि वाहन चालविणे या दोन्ही क्रिया सोबत असतील तर सहाजिकच मोबाइलवर बोलण्याकडे चालकाचे अधिक लक्ष जाते. त्यामुळे वाहनावरील ताबा सुटून अपघात होऊ शकतो. दुचाकी चालविताना मान वाकडी करून खांदा आणि मानेमध्ये मोबाइल पकडून बिनधास्तपणे मोबाइलवर बोलत असतात.  त्यामुळे अशांना पकडण्याची विशेष मोहीम राबवून मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्याची गरज आहे. दंडात्मक कारवाईबरोबरच वाहन परवाना निलंबित करण्याचे प्रमाण वाढले तरच या अशा वाहनधारकांमध्ये जरब निर्माण होईल. तसेच मोबाइल जप्त केले तर अशा प्रकारांना आळा बसेल.  

२०० रुपये दंड वाहन चालवताना मोबाइलवर बोलताना पोलिसांनी पकडल्यास २०० रुपये दंड आकारला जातो. ही दंडाची रक्कम कमी असल्याने अनेकदा वाहनचालक मोबाइलवर बोलताना आढळून येतात. मात्र चिरीमिरी देऊन त्यांना सोडून दिले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कारवाईची भीती कमी झाली असल्याचे दिसून येते.  

पनवेल आणि परिसरात वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांवर कारवाई सुरूच आहे. यापुढेही अशा चालकांवर कारवाई करणार आहोत. वाहन चालविताना कोणीही मोबाइलवर बोलू नये. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. आपली काळजी आपणच घ्यावी.तरच अपघातापासून वाचता येईल.- एन. विश्वकारकळंबोली वाहतूक शाखा

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसNavi Mumbaiनवी मुंबई