शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खारफुटीच्या रक्षणासाठी ग्रीन पोलीस यंत्रणेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:21 IST

एमएमआरडीए क्षेत्रामध्ये खारफुटीची कत्तल करण्याच्या घटना वाढत आहेत, या विषयी विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात येतात; परंतु त्यांचा तपास गतीने होत नाही.

नवी मुंबई : एमएमआरडीए क्षेत्रामध्ये खारफुटीची कत्तल करण्याच्या घटना वाढत आहेत, या विषयी विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात येतात; परंतु त्यांचा तपास गतीने होत नाही. पर्यावरणाची हानी थांबविण्यासाठी या गुन्ह्यांचा तपास वेगाने करण्याची गरज असून, त्यासाठी ग्रीन पोलीस यंत्रणा राबविण्याची गरज असल्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, उरण परिसराला समृद्ध खाडीकिनारा लाभला आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी ही वनसंपदा जतन करणे आवश्यक आहे; परंतु काही ठिकाणी विकासाच्या नावाखाली बेसुमार वृक्षतोड केली जात आहे. उच्च न्यायालयानेही याची दखल घेऊन कांदळवन देखरेख समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. सद्यस्थितीमध्ये वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात पर्यावरणप्रेमींनी अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारींच्या आधारावर संबंधितांवर गुन्हेही दाखल झाले आहेत; पण दाखल झालेल्या गुन्ह्यांचा गतीने तपास होत नाही. पोलीस स्टेशनमध्ये यासाठी स्वतंत्र यंत्रणाच उपलब्ध नाही. यामुळे शासनाने एमएमआरडीए परिसरामध्ये पर्यावरणविषयी दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा, अशी मागणी द नेचर कनेक्ट, श्री एकविरा आई प्रतिष्ठान व वॉचडॉग फाउंडेशनने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.द नेचर कनेक्टचे बी. एन. कुमार यांनी या विषयी माहिती देताना सांगितले की, कांदळवन संरक्षणासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती जास्तीत जास्त गुन्हे नोंदवू शकते. गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलीस तपासासाठी एक ते दोन महिने लावतात. वेळकाढूपणामुळे आरोपी सापडतच नाहीत. जेएनपीटी महामार्गाच्या रुंदीकरणासाठी ४५०० वृक्षांचे नुकसान झाले आहे; परंतु या प्रकरणी संबंधितांवर काहीच कारवाई झालेली नाही. दास्तान फाटा येथे मातीचा भराव टाकल्यामुळे खारफुटीचे नुकसान झाले आहे. अशा प्रकारच्या तक्रारींचा जलदगतीने निपटारा करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रामध्ये केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई