शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

सीएसएमटी व ठाणे ते उरणदरम्यान थेट लोकल हवी; रेल्वे प्रवासी संघटनेने वेधले लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 08:16 IST

उरणपर्यंत तयार केलेल्या मार्गाचे १२ जानेवारी रोजी उद्घाटन झाले. पूर्वी नेरूळ/बेलापूर ते खारकोपरदरम्यान चालवल्या जाणाऱ्या लोकल फेऱ्या त्यानंतर  उरणपर्यंत वाढविण्यात आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महानगर प्रदेशात राहणाऱ्या प्रवाशांची आजही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) गाठताना दमछाक होत आहे. विशेषत: ठाणे, उरण पट्ट्यात तर आजही लोकल प्रवाशांचे हाल होत आहेत. यावर उपाय म्हणून आणि प्रवाशांचा लोकल प्रवास सुखकर व्हावा, यासाठी  सीएसएमटी व ठाणे ते उरणदरम्यान थेट लोकल सुरू करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे.

उरणपर्यंत तयार केलेल्या मार्गाचे १२ जानेवारी रोजी उद्घाटन झाले. पूर्वी नेरूळ/बेलापूर ते खारकोपरदरम्यान चालवल्या जाणाऱ्या लोकल फेऱ्या त्यानंतर  उरणपर्यंत वाढविण्यात आल्या. या भागातील तरघर, बामणडोंगरी, खारकोपर, गव्हाण, रांजणपाडा, न्हावाशेवा, द्रोणागिरी आणि उरण या स्थानकांपर्यंत लोकल उपलब्ध झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. परंतु, बेलापूर-नेरूळ  ते उरणदरम्यान सीएसएमटी व ठाण्याहून थेट उरणपर्यंत लोकल सेवा सुरू होणे गरजेचे आहे.  ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे-नेरूळदरम्यान व हार्बर मार्गावर सीएसएमटी-बेलापूरदरम्यान लोकल  चालवल्या जातात. यापैकी काही ठाणे-नेरूळ  लोकलचा पुढे उरणपर्यंत विस्तार करण्याची, तर काही सीएसएमटी-बेलापूर लोकल नेरूळ-सीवूड दारावेनंतर उरणकडे वळविण्याची आवश्यकता आहे.

नीटनेटकी व्यवस्थासीएसएमटी व ठाण्याहून ये-जा करणाऱ्या लोकल उरण मार्गावर वळविण्यासाठी नेरूळ स्थानकाजवळ आवश्यक ते सांधे (क्रॉसओव्हर) बसविलेले असल्याने, येथे रेल्वेमार्ग बदलण्याची सोय आहे. जानेवारीत खारकोपरच्या पुढे उरणपर्यंत लोकल सेवेचा विस्तार करताना, रेल्वे प्रशासनाने या सेक्शनवरील लोकलची पूर्वीची स्थिती बदलूून उरण ते सीएसएमटी/ ठाणे लोकल सुरू करण्यासाठी नीटनेटकी व्यवस्था केल्याने, सीएसएमटी / ठाणे ते उरणदरम्यान थेट लोकल फेऱ्या सुरू कराव्यात.

‘लोकल बदलून अनेकांचा प्रवास’ उरणपर्यंत लोकल वाहतूक सुरू होऊन तीन महिने झाले तरी अद्याप या भागात नेरूळ व बेलापूरहून शटल स्वरूपात लोकल फेऱ्या चालविल्या जात असल्याने मुंबई महानगरातून या सेक्शनवर प्रवास करायला प्रवाशांना, सध्या वडाळा/ पनवेल/ दादर/ कुर्ला/ ठाणे/ नेरूळ/ बेलापूरपैकी दोन किंवा तीन ठिकाणी लोकल बदलून प्रवास करावा लागत आहे. परिणामी, प्रवाशांच्या सोईसाठी आता ठाणे ते उरण व सीएसएमटी ते उरण दरम्यान थेट लोकल सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे.

अडचण येणार नाहीसीएसएमटी ते जुईनगर, ठाणे ते तुर्भे दरम्यानच्या स्थानकावर व नेरूळ स्टेशनातील फलाट क्रमांक १ ते वरील इंडिकेटरवर उरण लोकल  दर्शविण्याची तसेच उरण ते नेरूळ दरम्यानच्या स्थानकातील इंडिकेटरवर सीएसएमटी व ठाणे लोकल  दर्शविण्याची सोय केल्यास सीएसएमटी व ठाणे ते उरणदरम्यान थेट लोकल  फेऱ्या सुरू करण्यास अडचण येणार नाही.

पश्चिम रेल्वेवरील मीरा-भाईंदर, वसई-विरार, भिवंडी येथून बसने प्रवासी ठाणे स्थानकात येतात. ट्रान्स हार्बरवरील दिघा ते तुर्भे दरम्यानच्या नवी मुंबईतील उपनगरांतून कर्मचारी न्हावाशेवा येथील जवाहरलाल नेहरू व अन्य पोर्टमध्ये, पोर्टशी संबंधित व्यवसायात, तरघरजवळ नवी मुंबईसाठी तयार केल्या जात असलेल्या नवीन विमानतळ बांधकामाच्या प्रकल्पात नोकरी/ व्यवसायानिमित्त ये-जा करीत असतात. त्यांना नीट प्रवास करता आला पाहिजे.- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ सबअर्बन रेल्वे यात्री संघ

टॅग्स :localलोकल