शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चिरनेरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 15:17 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक वरिष्ठ नेत्यांच्या कारभाराला कंटाळून चिरनेर येथील महिला- पुरुष कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.

मधुकर ठाकूर 

उरण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक वरिष्ठ नेत्यांच्या कारभाराला कंटाळून चिरनेर येथील महिला- पुरुष कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. या नवनिर्वाचित कार्यकर्त्यांच्या हाताला शिवबंधन बांधून व  शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन, माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी शिवसेना पक्षातर्फे या नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचे स्वागत केले. 

चिरनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उरण तालुका युवक संघटनेचे उपाध्यक्ष निलेश ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे उरण तालुका उपाध्यक्ष मिलिंद ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिरनेर गाव अध्यक्ष अमर ठाकूर यांच्यासह ठाकूर परिवारातील अनेक महिला पुरुष कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून या महिला पुरुष कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम केले .परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांची मोठी निराशा झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक वरिष्ठ नेत्यांनी या कार्यकर्त्यांना कधी विश्वासात घेतलेच नाही. गलथान व मनमानी कारभाराला कंटाळून अमर ठाकूर, निलेश ठाकूर, मिलिंद ठाकूर यांच्याबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर  विश्वास ठेवून, शिवसेनेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. माजी आमदार मनोहरशेठ भोईर, शिवसेना उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, उरण पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर मोकल, शेकापचे सुरेश पाटील, काँग्रेसचे अलंकार परदेशी चिरनेर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य किरण कुंभार, इंटकचे राजेंद्र भगत यांच्या  प्रमुख उपस्थितीसह  महाआघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या  उपस्थितीत  रविवारी २९ ऑक्टोबर रोजी या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे .

यावेळी महाआघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या सेनेतील प्रवेशामुळे महाआघाडीसाठी निवडणूक आणखी सोपी झाली आहे.