शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूककोंडीतून नवी मुंबईकरांची होणार सुटका; उड्डाणपुलांसह महामार्गांना आर्म ब्रिजने जोडणार

By नारायण जाधव | Updated: February 20, 2024 19:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क,  नवी मुंबई : टीसीसी औद्योगिक वसाहत, एपीएमसी मार्केटसह वाढते नागरीकरण, औद्योगिक क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत जाणारे डेटा ...

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : टीसीसी औद्योगिक वसाहत, एपीएमसी मार्केटसह वाढते नागरीकरण, औद्योगिक क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत जाणारे डेटा सेंटरचे जाळे यामुळे नवी मुुंबई महापालिका क्षेत्रात ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरांतून जाणारे महामार्ग आणि बहुतांश अंतर्गत रस्त्यांवर रेाजच वाहतूक कोंडी होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने येत्या वर्षात रस्त्यांची नवी कामे घेतल्याने शहरवासीयांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होणार आहे.वाशी, सेक्टर १७ पामबीच मार्गावर सायन पनवेल महामार्गावर २९० मीटर लांब व ६.५० मीटर रुंदीचा उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू असून त्यामुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचून इंधनाचीही बचत होणार आहे.ऐरोली विभागातील मध्यवर्ती नाल्यावरील बसडेपो, सेक्टर ३, श्रीराम स्कूल, सेक्टर १९ लगतच्या एकूण ४ कल्व्हर्टची पुनर्बांधणी, दुरुस्ती व सुधारणा प्रस्तावित आहे.महापे उड्डाण आर्म : महापे उड्डाणपुलावरून ठाणे-बेलापूर रस्त्यावर जाण्यासाठी आर्म बांधण्याच्या कामास प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली असून त्या कामाच्या निविदा मागविण्यात येणार आहेत.बेलापूर विभागातील आम्रमार्ग ते से. ११, १५, दिवाळेगांवमार्गे सायन –पनवेल महामार्गाला जोडण्यासाठी पूल आणि नेरूळ फेज -१ सेक्टर २१ ते सेक्टर २८ जोडण्याकरिता पुलाच्या कामाचा व्यवहार्यता अहवाल तयार केला असून त्याकरिता रक्कम २२० कोटी खर्च अपेक्षित आहे. तसेच त्यापैकी ५० खर्चाची सिडकोकडे मागणी केलेली आहे......तुर्भे पुलाला फायझर कंपनीकडील रस्त्याला जोडण्यासाठी मार्ग बांधण्याकरिता यासंबंधी तांत्रिक व वित्तीय अहवाल तयार केला असून त्यामध्ये सल्फर कंपनीची ९ मीटर जागा संपादित करावी लागत असल्याने त्यामध्ये बदल करून ठाणे-बेलापूर रस्त्यावरून सायन पनवेल ब्रिजवर आर्म उभारणे प्रस्तावित आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होणार असून यासाठी १२६ कोटी खर्च अपेक्षित असून एमएमआरडीएकडे निधीची मागणी केली.........कोपरखैरणे व घणसोली या नोडमधील अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी मोकळे राहण्यासाठी ठाणे-बेलापूर रस्त्यावरुन महापे पुलापासून ते घणसोली येथील पामबीचपर्यंत पूल बांधणे (दुसरे आर्म) आवश्यक असल्याने त्याकरिता ४ हजार चौ.मी. भूखंडाची मागणी एमआयडीसीकडे केलेली आहे................घणसोली-ऐरोली खाडीपुलासह रस्त्याचा खर्च १६८ कोटींनी वाढलाघणसोली-ऐरोली खाडीपूल व रस्ता : मागील १५ वर्षे प्रलंबित असलेल्या घणसोली रस्ता व ऐरोलीला जोडणारा खाडी पूल बांधण्याबाबत महानगरपालिकेने नियोजन केले आहे. नव्या नियोजनात १.९५ कि.मी. ऐवजी ३.४७ कि.मी. चा रस्ता व खाडी पूल बांधून हा रस्ता काटई -ऐरोली रस्त्याला जोडण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पर्यावरण विभागाच्या आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या असून या प्रकल्पाचा खर्च ३७२ कोटी ऐवजी ५४० कोटी अपेक्षित आहे. प्रकल्पाच्या बांधकाम खर्चापैकी ५० टक्के खर्च म्हणजे २७० कोटी रक्कम सिडको देणार आहे. प्रकल्पाच्या कामाची निविदा काढली असून, एप्रिल २०२४ अखेरपर्यंत कामास सुरुवात करण्यात येईल. या रस्त्यासह खाडी पुलामुळे घणसोलीकडून कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरकडे व मुलुंडमार्गे मुंबईकडे जाणे-येणे सोयीचे होणार आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका