शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

Navi Mumbai: छमछमणाऱ्या डान्स बारना आशीर्वाद कुणाचा?

By नारायण जाधव | Updated: June 26, 2023 15:23 IST

Dance Bars: नवी मुंबईतील शिरवण्याच्या निधी डान्स बारवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यानंतर लेडीज आणि डान्स बारचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

-  नारायण जाधव (उप-वृत्तसंपादक)नवी मुंबईतील शिरवण्याच्या निधी डान्स बारवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यानंतर लेडीज आणि डान्स बारचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यात ज्या बारवरून डान्स बारबंदीची घोषणा तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली होती, तो डान्स बारही नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील मुंबई- पुणे महामार्गावरील कोनगावातील होता.

डान्स बार बंदीनंतर सुरुवातीचा काही काळ वगळता शहरातील डान्स बार पुन्हा एकदा नव्या जोमाने पहाटे उशिरापर्यंत सुरू आहेत. किंबहुना ते पूर्वीपेक्षा अधिक जोमाने सुरू आहेत. यामुळे नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी शहरातील लेडीज आणि डान्सना कुणाचा आशीर्वाद 'आहे, खात्यातील 'विवेक' सोडून तोंड 'काळे' करणारे कोणते अधिकारी त्यात विशेष रस घेतात, याचा शोध घेतल्यास त्यांना अनेक रहस्यमय गोष्टी निर्दशनास येतील. खालच्या • अधिकाऱ्यांवर विसंबून न राहता त्यांनी स्वतः लक्ष घातले, तरच हजारो संसार उद्ध्वस्त करणारी ही बार संस्कृती संपवता येईल.

न्यायालयाने काही अटी व शर्तीवर बारना परवानगी दिली; परंतु या अटी आणि शर्तींना ठाणे खाडीत बुडवून आज नवी मुंबईत १५० च्या आसपास बार, १०० च्यावर क्लब सुरू आहेत. यात अनेक शासकीय आणि पोलिस अधिकारी स्लीपिंग पार्टनर असल्याची कोननजीकच्या एका बारबाबत चर्चा आहे.

पनवेलचे तत्कालीन आमदार विवेक पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बारबंदीची घोषणा केली होती. यावरून राज्यभर गहजब झाला होता. नंतर बारमालक न्यायालयात गेले. 

कोपरखैरण्यात नटराज, मेट्रो हे बार निवासी इमारतीत सुरू आहेत. वाशी सेक्टर १७ मधील बार तर हॉस्पिटलला लागून आहेत. खाली बार आणि वर लॉजिंग, असे दृश्य अनेक ठिकाणी दिसते. 

आबांसारखा वचक निर्माण व्हावायात पार्किंग कुठेच नाही. अनेक इमारती अनधिकृत आहेत. फायर ब्रिगेडचे परवाने नाहीत. सत्रा प्लाझा या इमारतीत जितके पब आणि हुक्का पार्लर असतील, तेवढे संपूर्ण एमएमआर क्षेत्रात नसतील. सानपाडा रेल्वे स्थानकाजवळ असंख्य मसाज पार्लर आहेत. पोलिस, उत्पादन शुल्क, महापालिका, जिल्हाधिकायांच्या नाकावर टिच्चून हे सर्व सुरु आहे. यामागे हप्तेखोरी असून, ती वसूल . करायला बारमालकांना राम राम बोलून पोळणारे सचिन, बंटी हे गुळवेलीसारखे कर्मचारी, तर बारमालकांतील मंजू, वाला याच्यासारखे दलाल आहेत. त्यांना वठणीवर आणण्यासाठी दिवंगत आर. आर. पाटील आबा यांच्यासारखा वचक निर्माण करण्याची गरज आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई