शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Navi Mimbai: शिक्षक, पदवीधर मतदारसंघासाठी बुधवारी मतदान, खासगी आस्थापनेवरील मतदारांना दोन तासांची विशेष सवलत

By कमलाकर कांबळे | Updated: June 25, 2024 20:02 IST

Vidhan Parishad Election Result:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी तीन जागांसाठी आज मतदान होणार आहे. त्यासाठी संबधित सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. विशेष म्हणजे मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता याव्यात यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत.

- कमलाकर कांबळे नवी मुंबई - विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी तीन जागांसाठी आज मतदान होणार आहे. त्यासाठी संबधित सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. विशेष म्हणजे मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता याव्यात यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील खासगी आस्थापनेवरील मतदारांना मतदान करता यावे यासाठी दोन तासांची विशेष सवलत जाहीर केली आहे.

कोकण विभाग पदवीधर, मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदारसंघनिहाय मतदारसंख्या जाहीर केली आहे. त्यानुसार या तिन्ही मतदारसंघात एकूण ३ लाख ५९ हजार ७३७ मतदार बुधवारी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान, अधिकाधिक मतदारांना मतदान करता यावे, यासाठी निवडणूक विभागाने कंबर कसली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी यापूर्वीच २६ जूनची नैमित्तिक रजा जाहीर केली आहे. परंतु, खासगी आस्थापनेवर काम करणाऱ्या मतदारांना विशेष नैमित्तिक रजा लागू होत नसल्याने त्यांच्यासाठी मतदान कालावधीत दोन तासांची विशेष सवलत दिल्याचे कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी कळविले आहे.

१ जुलैला नेरूळ येथे मतमोजणीमतदार यादी तसेच मतदान केंद्रासंदर्भात माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी हेल्पलाइन उपलब्ध केली आहे. या हेल्पलाइनद्वारे मतदाराचे नाव कुठल्या केंद्रात आहे किंवा नाही याबाबत माहिती देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. १ जुलै, २०२४ रोजी नेरूळ येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवनमध्ये मतमोजणी होणार आहे. त्यासाठी संबधित यंत्रणा सज्ज केल्या आहेत.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024Votingमतदान