शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई विकास आघाडी सर्व जागांवर निवडणूक लढणार - पदाधिकाऱ्यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 00:55 IST

९ फेब्रुवारी रोजी बेलापूर येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध १३ पक्ष आणि संघटना एकत्र आल्या असून येणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नवी मुंबई विकास आघाडी सर्वच प्रभागात निवडणुका लढणार असल्याची घोषणा नवी मुंबई विकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली. ९ फेब्रुवारी रोजी बेलापूर येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.नवी मुंबई शहरातील सिडको वसाहती, गाव-गावठाण आणि झोपडपट्टी भागात गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्या असून त्या सोडविण्याकडे दुर्लक्ष केला असल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अफसर इमाम यांनी केला. शहरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडवून नागरिकांना न्याय देण्यासाठी लोकशाहीला मानणारे राजकीय पक्ष आणि संघटना एकत्र आल्या असून नवी मुंबई विकास आघाडी केली असल्याचे घर हक्क संघर्ष समितीचे हिरामण पगार यांनी सांगितले. नवी मुंबई विकास आघाडीतील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात कार्यकर्ता मेळावा घेतला जाणार असल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालय सचिव राजेंद्र कोरडे यांनी सांगितले. यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष ख्वाजामिया पटेल, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, स्वराज इंडिया, जनता दल-सेक्युलकर, सोशालिस्ट पार्टी ऑफ इंडिया, महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन, बंजारा क्रांती दल, महाराष्ट्र जनशक्ती सेवा, वंचित समाज इन्साफ पार्टी आदी पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका