शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

डीपीएस फ्लेमिंगो तलाव वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमी उतरले रस्त्यावर, केले मानवी साखळी आंदोलन

By नारायण जाधव | Updated: May 11, 2024 15:48 IST

Navi Mumbai News: शनिवारी जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाचे औचित्य साधून पर्यावरणप्रेमींनी फ्लेमिंगोंचा अधिवास असलेल्या पाणथळ जागा वाचवा, त्यामध्ये हस्तक्षेप करू नका, डीपीएस तलाव वाचवा, असे फलक हातात घेऊन मूक मानवी साखळी उभारून आंदोलन केले.

- नारायण जाधवनवी मुंबई - नवी मुंबईतील पाम बीचवरील डीपीएस फ्लेमिंगो तलाव वाचविण्याची मोहीम दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. याच अनुषंगाने शनिवारी जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाचे औचित्य साधून पर्यावरणप्रेमींनी फ्लेमिंगोंचा अधिवास असलेल्या पाणथळ जागा वाचवा, त्यामध्ये हस्तक्षेप करू नका, डीपीएस तलाव वाचवा, असे फलक हातात घेऊन मूक मानवी साखळी उभारून आंदोलन केले.

#SaveDPSflamingoLake ची घोषणा करणारे एक मोठे बॅनर, फलक हातात घेऊन आंदोलकांनी फ्लेमिंगोंच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करून आवाज उठवला.मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करून भरतीच्या पाण्याचा प्रवाह रोखल्याने ३० एकरांचा डीपीएस तलाव कोरडा पडून धोक्यात आला आहे. नेरूळ जेट्टीच्या बांधकामामुळे या तलावात येणारा भरतीच्या पाण्याचा प्रवाह अडवला गेल्याचे नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी निदर्शनास आणून दिले आहे. पाण्याचा प्रवाह रोखल्याने फ्लेमिंगो अन्नाच्या शोधात इतरत्र भरकटत असल्याने आतापर्यंत १० हून अधिक फ्लेमिंगो मरण पावले असून पाच जखमी झाले असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय तसेच मुख्यमंत्र्यांनी नॅटकनेक्टच्या तक्रारीला प्रतिसाद देऊन तलावातील पाणी अडवण्याच्या चौकशीचे निर्देश दिले आहेत. परंतु, अद्याप जमिनीवर कोणतीही कारवाई झालेली नाही, असे कुमार म्हणाले. नवी मुंबई एन्व्हायर्नमेंट प्रिझर्व्हेशन सोसायटीचे संदीप सरीन म्हणाले की, उल्लंघन हे न्यायालयाच्या अवमान असून या संदर्भात आमची संस्था वकिलांशी सल्लामसलत करत आहे. सिडको-वन अधिकाऱ्यांवर कारवाई हवीसेव्ह फ्लेमिंगोज अँड मॅन्ग्रोव्हज फोरमच्या अंजली अग्रवाल म्हणाल्या, “वास्तविक, आम्हाला आशा आहे की, महानगरपालिका, सिडको आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या संकटाचा आढावा घेण्यासाठी या तलावाला भेट दिल्याने तलावातील पाण्याचा प्रवाह पूर्ववत होईल.’’ सिडकोचे अधिकारी इतके निर्दयी आणि बेजबाबदार कसे असू शकतात, असा प्रश्न पारसिक ग्रीन्सचे विष्णू जोशी यांनी केला. बेलापूरचे कार्यकर्ते हेमंत काटकर यांनी खंत व्यक्त करून लोकांनी रस्त्यावर उतरून संबंधित अधिकाऱ्यांना पर्यावरणाच्या ऱ्हासासाठी जबाबदार धरले पाहिजे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई