शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावरून मार्च २०२५ मध्ये पहिल्या विमानाचे टेकऑफ, मुरलीधर मोहोळ यांची माहिती

By कमलाकर कांबळे | Updated: July 13, 2024 19:40 IST

Navi Mumbai News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटी असणारे देशातील पहिले विमानतळ असेल. या विमानतळावरून मार्च २०२५ मध्ये पहिल्या विमानाचे टेकऑफ होईल, असा विश्वास नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.

- कमलाकर कांबळे

नवी मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटी असणारे देशातील पहिले विमानतळ असेल. या विमानतळावरून मार्च २०२५ मध्ये पहिल्या विमानाचे टेकऑफ होईल, असा विश्वास नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्यासोबत राज्यमंत्री मोहोळ यांनी शनिवारी विमानतळ प्रकल्पाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. विमानतळाला स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे.

नवी मुंबई विमानतळ हा देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. विविध कारणांमुळे रखडलेल्या या प्रकल्पाच्या कामाने आता वेग घेतला असून, त्याचा पहिला टप्पा मार्च २०२५ मध्ये पूर्ण करण्याचा निर्धार केंद्र शासनाने केला आहे. या विमानतळ प्रकल्पासाठी वेगवेगळ्या संस्था काम करीत असून प्रत्येकीला तिची जबाबदारी आणि डेडलाइन आखून दिली आहे. त्यानुसार प्रत्येक संस्था डेडलाइन हुकणार नाही, त्यादृष्टीने काम करीत आहे. विशेषत: सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या कामावर विशेष लक्ष केंद्रित केले असून, तीन महिन्यांत त्यांनी जवळपास आठ ते दहा वेळा या प्रकल्पाला भेट देऊन कामाची पाहणी केली आहे.

शनिवारी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या भेटीप्रसंगी विजय सिंघल यांच्यासह सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल, खासदार श्रीकांत शिंदे तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचे जीत अदानी, मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीजेके शर्मा उपस्थित होते.

विमानतळाची वैशिष्ट्ये नवी मुंबई विमानतळ पाच टप्प्यांत उभारले जाणार आहे. टप्पा क्रमांक १ आणि २ एकत्रित पूर्ण केले जाणार आहे. यात एक टर्मिनल आणि एक रन वे असणार आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत हा टप्पा व्यावसायिक वापरासाठी खुला होईल. याअंतर्गत दोन कोटी प्रवासी प्रवास करू शकतील, असा अंदाज आहे. तर टप्पा क्रमांक ३, ४ आणि ५ मध्ये तीन टर्मिनल आणि एक रन वे असणार आहे. या टप्प्यानंतर वार्षिक ९ कोटी प्रवासी वाहतूक होईल, असा अंदाज आहे.

टॅग्स :murlidhar moholमुरलीधर मोहोळNavi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ