शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई : सुपरस्पेशालिटी उपचार नेमके कुणासाठी ? १२ वर्षांनंतरही गरीब रुग्ण उपचारांपासून वंचितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:56 IST

गरीब रुग्णांवर मोफत उपचार मिळवून देण्यासाठी पालिकेने वाशी रुग्णालयातील २० हजार चौरस फूट जागा अल्प किमतीमध्ये हिरानंदानी - फोर्टीज रुग्णालयास २००६ मध्ये दिली आहे.

नामदेव मोरे नवी मुंबई : गरीब रुग्णांवर मोफत उपचार मिळवून देण्यासाठी पालिकेने वाशी रुग्णालयातील २० हजार चौरस फूट जागा अल्प किमतीमध्ये हिरानंदानी - फोर्टीज रुग्णालयास २००६ मध्ये दिली आहे. प्रत्यक्षात १२ वर्षांनंतरही गरीब रुग्णांना याचा लाभ झालेला नाही. एप्रिल २०१५ मध्ये प्रत्येक वर्षी ८०० रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचे सुधारित धोरण निश्चित करण्यात आले. एक वर्षानंतर या धोरणास पुन्हा सर्वसाधारण सभेची मान्यता घेणे आवश्यक होते; परंतु तीन वर्षांनंतरही अद्याप सर्वसाधारण सभेला याविषयी माहिती देण्यात आलेली नाही.नवी मुंबई महानगरपालिका शहरवासीयांच्या आरोग्य सुविधांवर प्रत्येक वर्षी १२५ ते १५० कोटी रुपये खर्च करत आहे. २०१८ - १९ या आर्थिक वर्षासाठी तब्बल २०३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एवढा प्रचंड खर्च करूनही नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. माता बाल रुग्णालयांचा कारभार जवळपास ठप्प आहे. आरोग्य सेवेचा सर्व भार वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयावर पडला आहे. नवी मुंबईकरांवर मोफत उपचार मिळवून देण्यासाठी २००६ मध्ये हिरानंदानी रुग्णालयाबरोबर करार केला. वाशी रुग्णालयातील तब्बल २० हजार चौरस फूट जागा प्रति चौरस फूट ३ रुपये ७४ पैसे दराने देण्यात आली. एक वर्षात हिरानंदानी रुग्णालयाने ही जागा फोर्टीज हॉस्पिटलला दिली. २००८ मध्ये प्रत्यक्षात रुग्णालय सुरू झाले; परंतु पालिकेचे धोरण ठरले नसल्यामुळे २०११ पर्यंत एकाही रुग्णावर मोफत उपचार मिळू शकले नाही. पालिकेने धोरण ठरविल्यानंतरही गरीब रुग्णांवर तेथील उपचार परवडत नव्हते.पालिकेने एप्रिल २०१५ मध्ये वर्षाला ८०० रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया व उपचार करण्याचे सुधारित धोरण तयार केले. एक वर्षासाठी सर्वसाधारण सभेने या धोरणाला मंजुरी दिली होती. शहरवासीयांना याचा लाभ होत आहे का हे तपासून पुढील वर्षी पुन्हा सर्वसाधारण सभेपुढे हा विषय मांडणे आवश्यक होते. पण प्रशासनाने तीन वर्षामध्ये किती रुग्णांवर उपचार केले याचीही माहिती दिलेली नाही व सर्वसाधारण सभेपुढे पुन्हा हा विषय आणलेला नाही. सद्यस्थितीमध्ये पालिकेच्या या योजनेचा लाभ फक्त राजकीय वशिला असणाºयांनाच होत आहे. नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री यांचा वशिला असणाºया रुग्णांना पालिकेच्या कोट्यातून फोर्टीजमध्ये पाठविले जात आहे. गरीब रुग्णांना प्रतीक्षा यादीमध्ये थांबविले जात आहे. ज्या गरिबांसाठी ही योजना तयार केली त्यांना सुपर स्पेशालिटी उपचार मिळत नाहीत. नाइलाजाने त्यांना मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे किंवा जादा पैसे देवून खाजगी रुग्णालयांमधून उपचार घ्यावे लागत आहेत. मोफत उपचारांची अनागोंदी सुरू असून त्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.माहिती गोपनीय ठेवण्यावर भरपालिकेने २००६ मध्ये हिरानंदानीबरोबर करार केला. २००८ मध्ये तेथे प्रत्यक्ष फोर्टीज रुग्णालय सुरू झाले. २०११ पासून पालिकेने रुग्ण पाठविण्यास सुरुवात केली. सात वर्षांमध्ये किती नवी मुंबईकरांना याचा लाभ झाला याची माहिती पालिकेने अद्याप कधीच जाहीर केलेली नाही. याशिवाय या योजनेविषयी पालिका रुग्णालय व संकेतस्थळावरही माहिती दिलेली नाही. याविषयी माहिती गोपनीय ठेवण्यावरच जास्त भर दिला जात आहे.बोगस लाभार्थीउत्पन्नाचा खोटा दाखला देऊन पालिकेच्या योजनेचा लाभ घेतला जात आहे. यापूर्वी नेरूळमध्ये एक व्यक्तीने खोटा दाखला सादर केल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. वास्तविक महापालिका उपचार घेणाºयांची माहिती लपवत आहे. सर्व माहिती खुली केल्यास या याजनेतून गरिबांऐवजी श्रीमंतांनीच लाभ घेतल्याचे स्पष्ट होईल, असे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.कोट्यवधीचे नुकसानवाशीतील मध्यवर्ती ठिकाणी असणारी २० हजार चौरस फूट जागा पालिकेने कवडीमोल किमतीने हिरानंदानीला दिली आहे. प्रत्यक्षात या योजनेचा काहीही लाभ गरिबांना झालेला नाही. उपचार घेतलेले रुग्ण त्यांच्यावर होणारा खर्च याचा आकडा व बाजारभावाने रुग्णालयाचे भाडे यांचा ताळमेळ घातल्यास १२ वर्षांत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून याकडे कोणीच लक्ष देत नाही.वशिला असणाºयांनाच लाभपालिकेच्या कोट्यातून सर्वसामान्य गरीब रुग्णांवर मोफत सुपरस्पेशालिटी उपचार होणे आवश्यक आहे. पण प्रत्यक्षात गरिबांना त्याचा लाभ होतच नाही. नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी यांचा वशिला असणाºयांनाच या योजनेचा लाभ होत आहे. यामुळे ही योजना पूर्णपणे फसली आहे. 

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका