शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai: सहा महिन्यांत ईटीपी, एसटीपी सुरू करा, महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका

By नारायण जाधव | Updated: October 12, 2022 17:50 IST

Navi Mumbai: नवी मुंबई महापालिकेचे वाशी येथील ३०० खाटांचे हॉस्पिटल हे एसटीपी आणि ईटीपी प्लांटविना चालत असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निदर्शनास आले आहे.

- नारायण जाधव नवी मुंबई - नवी मुंबई महापालिकेचे वाशी येथील ३०० खाटांचे हॉस्पिटल हे एसटीपी आणि ईटीपी प्लांटविना चालत असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निदर्शनास आले आहे. याची गंभीर दखल घेऊन मंडळाने येत्या सहा महिन्यांत याठिकाणी पूर्ण क्षमतेचा एसटीपी किंवा ईटीपी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय आरोग्य सेवा देण्यासाठी आवश्यक असलेल्या नियमानुसार बँक गॅरंटी भरण्यासही सांगितले आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मूल्यमापन समितीच्या २९ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या आठव्या बैठकीत या झालेल्या चर्चेनुसार नवी मुंबई महापालिकेस हे आदेश देण्यात आले आहेत.

महापालिकेचे हे हॉस्पिटल वाशी सेक्टर १० येथील १,९१,१३४ इतक्या विस्तीर्ण क्षेत्रफळावर बांधले आहे. ते सुरू करण्याठी २००९ मध्ये परवानगी दिली होती. ती २०११ पर्यंत होती, तर महापालिकेला बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टनुसार एसटीपी अर्थात सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट किंवा ईटीपी अर्थात इन्फ्ल्यूएंट ट्रीटमेंट सुरू करण्यास सांगितले होते. त्यासाठी ३१ मार्च २०२२ पर्यंतची मुदत होती; परंतु हॉस्पिटल सुरू झाल्यापासून आजपर्यंत महापालिकेने यापैकी काहीही केलेले नाही. आरोग्यविषयक नियमांच्या महापालिकेचे हे कृत्य पूर्णत: विरोधात असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्याची गंभीर दखल घेतली आहे.

पिवळ्या श्रेणीतील कचरा विल्हेवाट प्रमाणपत्र घ्याहॉस्पिटल सुरू झाल्यापासून नवी मुंबई महापालिकेने रुग्णालयातून निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय कचरा विल्हेवाटीसाठी आवश्यक असलेले पिवळ्या श्रेणीतील कचरा विल्हेवाटीचे प्रमाणपत्र आजपर्यंत घेतलेले नसल्याची बाबही प्रदूषण मंडळाच्या निदर्शनास आली आहे. यामुळे असे प्रमाणपत्र सादर करण्यासही मंडळाने महापालिकेने सांगितले आहे.

१५० खाटा दिल्या खासगी हॉस्पिटललानवी मुंबई महापालिकेने या हॉस्पिटलमधील ३०० पैकी  १५० खाटा या एका खासगी हॉस्पिटलला नियमबाह्यरीत्या दिल्या आहेत. त्याठिकाणी पंचतारांकित खासगी रुग्णालय सुरू आहे. यामुळे हे खासगी हॉस्पिटल आता एसटीपी किंवा ईटीपी सुरू करण्याबाबत काय भूमिका घेते अन् महापालिका त्यावर काय कार्यवाही करते याकडे वैद्यकीय तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका