शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai: सोशल मीडियावरील मैत्री पडली २८ लाखाला, डॉक्टर महिलेची फसवणूक

By सूर्यकांत वाघमारे | Updated: July 3, 2024 19:17 IST

Navi Mumbai News: सोशल मीडियावरील मैत्री एका डॉक्टर महिलेला २८ लाखाला पडली आहे. या विदेशी व्यक्तीला कस्टमच्या तावडीतून सोडवण्याच्या प्रयत्नात त्यांनी हि रक्कम गमावली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात त्याच त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.

- सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई - सोशल मीडियावरील मैत्री एका डॉक्टर महिलेला २८ लाखाला पडली आहे. या विदेशी व्यक्तीला कस्टमच्या तावडीतून सोडवण्याच्या प्रयत्नात त्यांनी हि रक्कम गमावली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात त्याच त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.

पनवेल परिसरात राहणाऱ्या डॉक्टर महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. या महिलेची सोशल मीडियाद्वारे एका विदेशी व्यक्तीसोबत ओळख झाली होती. यावेळी सदर व्यक्तीने तो देखील डॉक्टर असून घटस्फोटित असल्याचे सांगितले होते. त्यांच्यात चांगली मैत्री झाली असता त्या व्यक्तीने आपण मुलासह भारतात येत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काहीच दिवसात त्या व्यक्तीने आपण दिल्ली विमानतळावर अडकलो असून आपल्याला कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले असल्याचे सांगितले.

आपल्यासोबत मोठ्या प्रमाणात विदेशी चलन असून ते सोडवण्यासाठी आव आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी त्याने डॉक्टर महिलेकडे मदत मागितली. यावेळी सोशल मीडियाद्वारे झालेल्या मित्राबद्दल सहानभूती दाखवत या महिलेने कथित कस्टम अधिकाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे वेगवेगळ्या खात्यावर २८ लाख रुपये भरले. त्यानंतर मात्र अधिक पैशाची मागणी होऊ लागल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली असून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमNavi Mumbaiनवी मुंबईSocial Mediaसोशल मीडिया